Govinda: पती चोर, गोल्ड डिगर..; गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडवर भडकली अभिनेत्री
Govinda: गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान कोमल राणी स्वर्णकारने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित टीकेला उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता अभिनेत्री राखी सावंतने कोमलला पती चोर आणि गोल्ड डिगर म्हटलंय.

अभिनेता गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याभोवती सुरू असलेली चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्या कथित नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या प्रकरणात अभिनेत्री राखी सावंतने आता थेट कोमल राणीवर निशाणा साधला आहे. राखीने तिच्याबद्दल तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राखीने गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाची बाजू घेत नाराजी व्यक्त केली. मुंबई विमानतळावर पापाराझींशी संवाद साधताना राखी सावंतने गोविंदाला त्याच्या वैवाहिक आयुष्याची आठवण करून दिली. सुनीता अहुजाने गोविंदासोबत जवळपास चार दशकं संसार केला असून त्यांना दोन मुलं आहेत, याचा उल्लेख करत राखीने प्रश्न विचारले.
यानंतर राखीने कोमल राणी स्वर्णकारवर थेट टीका केली. गोविंदासोबतच्या कथित संबंधांच्या चर्चेचा संदर्भ देत तिने कोमलला ‘पती चोर’ आणि ‘गोल्ड डिगर’ म्हटलं. इतकंच नाही तर इतरांच्या संसारात हस्तक्षेप केल्याचा आरोपही राखीने केला. तिच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओत राखी पुढे म्हणतेय, “ही रुपा.. काय आहे ही? ती माझ्याबद्दल काहीही बरळतेय. ती इतर सेलिब्रिटींबद्दलही बरळतेय. चिची भैय्या (गोविंदा) तुम्ही तिला पंख दिले आहेत. ऐक कोमल.. माझ्याशी पंगा घेऊ नकोस. मी सुनिता नाही. जे कोणी चित्रपट करत आहेत, त्यांनी ते आत्मसन्मानाने करावेत. तू एक चेटकीण आहेस, दुसऱ्यांचे नवरे हिसकावून घेतेय, नवरे चोरतेय. ती दुसऱ्यांच्या आयुष्यात आग लावते.”
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
राखी सावंत पुढे कोमलला ‘पैशांसाठी लग्न करणारी (गोल्ड डिगर)’ म्हणते. यावेळी ती गोविंदालाही प्रश्न विचारते. “संपूर्ण देश तुमच्यावर नाराज आहे. ज्या महिलेनं तुमच्याशी लग्न केलं, जिला दोन मुलं झाली आणि जी 40 वर्षे तुमच्यासोबत राहिली, तिला तुम्ही पाठिंबा देत नाही”, अशा शब्दांत ती गोविंदावर टीका करते.
गोविंदा आणि कोमल राणी यांचा ‘रूपा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गणपती उत्सवादरम्यान दोघं लालबागचा राजा दर्शनासाठी एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. त्या वेळी कोमलच्या कपाळावर सिंदूर दिसल्यानेही सोशल मीडियावर विविध तर्क लावले गेले होते. मात्र, कोमलनेनी याबाबत स्पष्टीकरण देताना गणपतीच्या चरणातील सिंदूर कपाळावर लागल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, कोमल राणीनेही सोशल मीडियावर तिची भूमिका मांडली होती. काही सेलिब्रिटी तिच्या आणि गोविंदांच्या खासगी आयुष्यावर टिप्पणी करत असल्याबद्दल तिने नाराजी व्यक्त केली. ‘रूपा’ हा चित्रपट दोघांनी जाहीर केला असून, ते एकत्र काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणं म्हणजे थेट नात्याबद्दल निष्कर्ष काढण्याचं कारण नाही, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना फटकारलं आहे.
