Rakhi Sawant | पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यासाठी राखी सावंत तयार, ‘या’ व्यक्तीशी बांधणार लग्नगाठ!

राखीने पुन्हा पुन्हा एकदा लग्न करण्याची घोषणा केली आहे. तुम्हीही विचार करत असाल की, ती यावेळी कोणाशी लग्न करणार आहे?(Rakhi Sawant wants to marry again with husband ritesh in front of media)

Rakhi Sawant | पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यासाठी राखी सावंत तयार, ‘या’ व्यक्तीशी बांधणार लग्नगाठ!
राखी सावंत

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिचे आयुष्य आता लोकांसाठी एक कोडे बनले आहे. कधीकधी ती म्हणते की, तिचे लग्न झाले नाही, तर कधी ती लग्न झाले असल्याचेही सांगते. लोक अजूनही तिच्या लग्नाबद्दल संभ्रमित आहेत. अशा परिस्थितीत राखी सावंत हिने आता एक नवीन विधान केले आहे. राखीने पुन्हा पुन्हा एकदा लग्न करण्याची घोषणा केली आहे. तुम्हीही विचार करत असाल की, ती यावेळी कोणाशी लग्न करणार आहे?(Rakhi Sawant wants to marry again with husband ritesh in front of media)

अभिनव नाही तर ‘या’ व्यक्तीशी करणार लग्न!

‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राखी सावंतने या घरात एक वेगळी ओळख निर्माण केली. या घरात तिने पती रितेश याच्याबद्दलही अनेक मोठे खुलासे केले होते. आता ती पुन्हा रितेशशीच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. ती सध्या रितेशच्या संपर्कात असल्याचे तिचे म्हणणे आहे. आता राखी अभिनवला विसरली असल्याचे दिसते आहे. ‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरात राखी अभिनव शुक्लासोबत (Abhinav Shukla) लग्न करण्याबद्दलही बोलली होती. इतकेच नाही तर, या घरात रुबिना अर्थात अभिनवची पत्नी असतानाही राखीने अभिनवसमोर अनेक वेळा आपले प्रेम व्यक्त केले होते.

आधी म्हणाली संबंध संपले!

या आधी राखी सावंतने ‘बिग बॉस 14’मध्ये म्हटले होते की, ती तिने पती रितेशबरोबरचे सर्व संबंध संपवले आहेत. परंतु, आता राखीने नेहमीप्रमाणे तिचा शब्द फिरवला आहे. आता राखीने ईटाइम्सशी बोलताना अनेक खुलासे केले आहेत. राखी म्हणाली की, ती सध्या रितेशच्या संपर्कात आहे आणि ते दोघे व्हिडीओ कॉलवरही बोलतात. अभिनेत्री पुढे म्हणाली की, रितेशने आता आमच्या लग्नाबद्दल सर्वांसमोर बोलण्याचे मान्य केले आहे (Rakhi Sawant wants to marry again with husband ritesh in front of media).

यावेळी मीडियासमोर लग्न करेन!

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

आपल्या नात्याविषयी बोलताना राखी सावंत पुढे म्हणाली की, ‘मी रितेशला पुन्हा एकदा लग्न करण्यास सांगितले आहे. व्हिसाच्या संदर्भात रितेशला सध्या कायदेशीर अडचणी येत आहेत. लवकरच सर्व काही ठीक होईल आणि तो भारतात येताच पुन्हा माझ्याशी लग्न करेल.’ यावेळी राखीनेही हे लग्न माध्यमांसमोर करणार असल्याचे सांगितले आहे.

आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये होणार सहभागी

यासह आगामी प्रोजेक्टबद्दल सांगताना राखी सावंत म्हणाली की, तिला नुकताच एक मोठा रिअॅलिटी शो देण्यात आला आहे. मात्र, राखीने अद्याप या शोबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. राखी म्हणाली की, ती सध्या निर्मात्यांशी चर्चा करत आहेत. राखी पुढे म्हणाली की, रितेश एक मोठा बिझनेसमन आहे आणि लवकरच तो या जगासमोर माझ्याशी पुन्हा लग्न करेल.

(Rakhi Sawant wants to marry again with husband ritesh in front of media)

हेही वाचा :

“अत्यंत घाण भाषेत आम्हीही रिअ‍ॅक्ट होऊ शकतो” प्रेक्षकाच्या अश्लाघ्य टीकेवर अभिनेता शशांक केतकर संतापला

Chali Chali Full Song Out : दाक्षिणात्य ‘लेडी सुपरस्टार’ समांथा अक्कीनेनीच्या हस्ते ‘थलायवी’चे पहिले गाणे प्रदर्शित!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI