Bigg Boss 14 | घरच्यांसमोर राखी सावंतची अंघोळ, राहुल अलीने दिला शैम्पू!

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) च्या घरात सध्या राखी सावंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. राखी सावंतने अभिनव शुक्लासोबत आता ब्रेकअप केलं आहे.

Bigg Boss 14 | घरच्यांसमोर राखी सावंतची अंघोळ, राहुल अलीने दिला शैम्पू!

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या घरात सध्या राखी सावंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. राखी सावंतने अभिनव शुक्लासोबत आता ब्रेकअप केलं आहे. कुठल्याही कारणावरून राखी चर्चेत असते. नुकताच बिग बॉसचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये राखी सर्वांसमोर अंघोळ करताना दिसत आहे. इतकेच नाही तर अली गोनी आणि राहुल वैद्य राखीचे डोके धुवत आहेत, तिच्या डोक्यावर शैम्पू टाकत आहेत. राखी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. काही दिवसांपूर्वी राखीने संपूर्ण शरीरावर अभिनव शुक्लाचे नाव काढले होते. (Rakhi Sawant was given shampoo by Ali Goni and Rahul Vaidya)

रुबीना दिलैक आणि राखी सावंतमध्ये देखील भांडणे होतात दुपारचे जेवण बनवण्याची ड्युटी रुबीनाची होती. मात्र, रुबीना जेवण बनवायच्या अगोदरच राखी जेवण बनवत होती. हे पाहुण रुबीनाला राग येतो आणि रुबीना राखीला म्हणते की, जेवण तयार करण्याची ड्युटी माझी असताना राखी तु का बनवत आहेस त्यावर राखी म्हणते की, सर्वांना भूक लागली होती म्हणून मी बनवत होते. त्यावर रुबीना राखीवर चिडते आणि म्हणते की, तुला सर्वांना असे दाखवायचे आहे की, तु खूप जास्त काम करते आणि मी काहीच काम करत नाही. याच विषयावर राखी-रुबीनामध्ये जोरदार हंगामा बघायला मिळाला.

संबंधित बातम्या : 

जास्मीनपासून वेगळं होताना अली गोनीला हुंदका, चाहते म्हणाले, ओव्हरअ‌ॅक्टिंगचे 50 रुपये कापा

Bigg Boss 14 | जास्मीन भसीनच्या चाहत्यांना मोठा धक्का, ट्विटरवर ‘हा’ हॅशटॅग ट्रेंड!

(Rakhi Sawant was given shampoo by Ali Goni and Rahul Vaidya)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI