Rakhi Sawant | सलमान खान याच्या लग्नासाठी राखी सावंतचा नवस, थेट केला याचा त्याग, म्हणाली…
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही.

मुंबई : राखी सावंत हे नेहमीच चर्चेत असलेले एक नाव आहे. राखी सावंत (Rakhi Sawant) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. राखी सावंत हिने बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडत लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. राखी सावंत हिने आदिल दुर्रानीसोबत (Adil Durrani) अगोदर कोर्टात लग्न केले आणि मग तिने निकाह केला. इतकेच नाही तर राखी सावंत हिने लग्नानंतर नाव फातिमा असल्याचे देखील सांगितले. काही दिवस राखी सावंत हिचा सुखाचा संसार दिसला. त्यानंतर अचानकच राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर काही गंभीर आरोप (Serious charges) केले. यांचा वाद थेट कोर्टात जाऊन पोहचला.
राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वी पापाराझी यांना बोलताना म्हटले की, आता मी आदिल दुर्रानी याला घटस्फोट देणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी नवीन आल्याचे म्हणताना देखील राखी सावंत दिसली. दुबईमधील व्यक्तीच्या प्रेमात राखी पडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राखी सावंत ही सतत दुबईला जाताना दिसते. तिथे तिने एका अकाडमी देखील सुरू केली आहे.
नुकताच राखी सावंत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही विमानतळावर दिसत आहे. यावेळी राखी सावंत हिने पायामध्ये चप्पल घातली नसल्याचे दिसून आले. यावेळी पापाराझी यांनी राखी सावंत हिला चप्पल का नाही घातली हे विचारले.
यावर राखी सावंत म्हणाली की, मी नवस मागितला आहे. पुढे राखी सावंत म्हणाली की, मी सलमान खानच्या लग्नासाठी नवस मागितला आहे. सलमान खानने लवकर लग्न करावे यासाठी नवस आहे. जोपर्यंत सलमान खान लग्न करणार नाहीत तो पर्यंत मी चप्पल अजिबात पायामध्ये घालणार नाहीये.
श्रीलंका, दुबई सर्वत्र मी चप्पल न घालताच फिरणार असल्याचे देखील राखी सावंत हिने म्हटले आहे. आता राखी सावंत हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओ पाहून राखी सावंत हिची खिल्ली उडवल्याचे दिसत आहे. एकाने लिहिले की, राखी सलमान खान कधीच लग्न करणार नाहीये आता तुला कधीच चप्पल घालता येणार नाही.
