रामूला मोठा झटका, कलाकारांचे कोट्यवधी थकवल्याप्रकरणी संघटनेची मोठी कारवाई!

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयज (एफडब्लूआइसीई) ने एका बैठकीत निर्णय घेतला आहे की, फेडरेशनच्या 32 संघटनांपैकी कोणतीही संघटना निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाहीत.

रामूला मोठा झटका, कलाकारांचे कोट्यवधी थकवल्याप्रकरणी संघटनेची मोठी कारवाई!
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 1:31 PM

मुंबई : फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयज (एफडब्लूआइसीई) ने एका बैठकीत निर्णय घेतला आहे की, फेडरेशनच्या 32 संघटनांपैकी कोणतीही संघटना निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाहीत. या संघटनेचे सदस्य देशामध्ये कुठल्याही भागात राम गोपाल वर्मा यांच्यासोबत काम करणार नाहीत. राम गोपाल वर्मा यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी चित्रपटाशी संबंधित कलाकार, टेक्नीशियन आणि कामगारांची सुमारे 1.25 कोटी रुपयांची थकबाकी दिली नाही. (Ram Gopal Varma did not pay Rs 1.25 crore to artists and technicians)

महासंघाचे अध्यक्ष बीएन तिवारी, सरचिटणीस अशोक दुबे आणि कोषाध्यक्ष गंगेश्वरलाल श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी राम गोपाल वर्मा यांना या संदर्भात कायदेशीर नोटीस पाठविली आहे. परंतु राम गोपाल वर्मा यांनी नोटीसीला कोणतेही उत्तर दिले नाही. 17 सप्टेंबर 2020 रोजी राम गोपाल वर्मा यांना एफडब्लूआइसीई एक पत्र लिहिले होते. ज्यात कुठल्या कामगाराचे किता पैसे या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली होती.

तसेच एफडब्लूआइसीई संघटनेने या संदर्भात राम गोपाल वर्मा यांना अनेक वेळा पत्र लिहिले होते मात्र, त्यांनी ते पत्र घेण्यासही नकार दिला. फेडरेशनचे अध्यक्ष बीएन तिवारी म्हणाले की, आम्हाला काही दिवसांपूर्वी समजले होते की, कोरोना काळात देखील राम गोपाल वर्मा त्यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग गोव्यात सुरू आहे. त्यावर आम्ही 10 सप्टेंबर 2020 रोजी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले होते.

राम गोपाल वर्मा यांनी गरीब टेक्नीशिय, कलाकार आणि कामगार यांची थकबाकी द्यावी अशी आमची इच्छा आहे. पण राम गोपाल वर्मा थकबाकी देण्यास टाळाटाळ करत आहेत. राम गोपाल वर्मा यांनी सत्या, रंगीला, राम गोपाल वर्मा की आग, कंपनी, सरकार, निःशब्द,भूत, दौड़ या सारखे हिट चित्रपट तयार केले आहेत.

संबंधित बातम्या : 

Ranbir Kapoor | लव्ह रंजन चित्रपटाच्या शूटिंगसाठी रणबीर कपूर दिल्लीत, चाहत्यांकडून जंगी स्वागत!

Kangana Ranaut | मुंबई हायकोर्टाची सुनावणी, कंगना-रंगोलीला पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा

(Ram Gopal Varma did not pay Rs 1.25 crore to artists and technicians)

Non Stop LIVE Update
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.