AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोक मरतील..; धुरंधर 2 – टॉक्सिकच्या टक्करची अमेरिका-इराणच्या युद्धाशी तुलना, दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

'धुरंधर 2' आणि 'टॉक्सिक' या दोन्ही चित्रपटांची टक्कर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 19 मार्च 2026 रोजी हे दोन्ही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. अशातच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

लोक मरतील..; धुरंधर 2 - टॉक्सिकच्या टक्करची अमेरिका-इराणच्या युद्धाशी तुलना, दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Toxic and Dhurandhar 2Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 02, 2026 | 11:16 AM
Share

आपल्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक राम गोपाल वर्मा पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी यशच्या ‘टॉक्सिक’ आणि रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस टक्करविषयी आपलं मत मांडलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणावाशी त्याचा संबंध जोडून अजब पोस्ट लिहिली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून ते ‘टॉक्सिक’ आणि ‘धुरंधर 2’ या चित्रपटांच्या होणाऱ्या टक्करबाबत सतत काही ना काही पोस्ट लिहित आहेत. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ आणि ‘केजीएफ’ फेम यशचा ‘टॉक्सिक’ हे दोन्ही चित्रपट येत्या 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

राम गोपाल वर्मा यांनी ‘टॉक्सिक’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांच्या टक्करला थेट युद्धाशी जोडलं आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांदरम्यान त्यांनी असं ट्विट केलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांच्या मते या दोन्ही परिस्थितींमध्ये परिणाम विनाशकारी असू शकतात, परंतु या विनाशाचं स्वरुप वेगळं असेल. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, ‘मी टॉक्सिक आणि धुरंधर 2 यांच्यातील संघर्षाची जितकी आतुरतेने वाट पाहत होतो, तितकीच अमेरिका-इराण संघर्षाचीही वाट पाहत होतो. एकात (युद्धात) लोकांचा जीव जाईल, तर दुसऱ्यात पैशांचं नुकसान होईल.’

राम गोपाल वर्मा यांची पोस्ट-

हे दोन्ही बिग बजेट चित्रपट असून दोन्हींवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे अर्थातच जेव्हा बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांची टक्कर होईल, तेव्हा कोणत्या तरी एका चित्रपटाचं मोठं नुकसान होणार आहे, किंवा दोन्हींचा नफा मर्यादित होईल. ‘धुरंधर 2’ हा रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाचा दुसरा भाग आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने 1000 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. दुसरीकडे यशच्या ‘टॉक्सिक’ या चित्रपटात कियारा अडवाणी, तारा सुतारिया, अक्षय ओबेरॉय, रुक्मिणी वसंत, नयनतारा यांच्या भूमिका आहेत. 2026 या वर्षातील ही बॉक्स ऑफिसवरील मोठी टक्कर मानली जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...