ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सिनेप्रेमींसाठी मेजवानी; पहा ‘ही’ यादी

सिनेप्रेमींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा आहे खास

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सिनेप्रेमींसाठी मेजवानी; पहा 'ही' यादी
सिनेप्रेमींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा आहे खास Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 2:56 PM

मुंबई- देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह पहायला मिळतोय. दिवाळीसोबतच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विविध चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दिवाळीच्या सणासोबतच हा आठवडा प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. सिनेप्रेमींसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही (OTT Platform) काही चांगले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. नवनवीन सीरिज आणि चित्रपटांची प्रेक्षक वाट पाहत असतात. येत्या काळात कोणते चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, ते पाहुयात..

राम सेतू- अक्षय कुमारचा राम सेतू हा चित्रपट येत्या 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही काळापासून हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलिन फर्नांडिस आणि सत्य देव यांच्या भूमिका आहेत.

हे सुद्धा वाचा

थँक गॉड- वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अजय देवगणचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अजयसोबत रकुल प्रीत सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या भूमिका आहेत.

गोविंदा नाम मेरा- गोविंदा नाम मेरा हा चित्रपट येत्या 30 ऑक्टोबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये विकी कौशल, कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्या भूमिका आहेत.

चोर निकल के भागा- यामी गौतमचा हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये यामीसोबत विकी कौशलचा भाऊ सनी कौशल मुख्य भूमिकेत आहे.

इंडियन प्रीडेटर 3- इंडियन प्रीडेटरचा तिसरा सिझन ‘मर्डर इन अ कोर्टरुम’ येत्या 28 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या दोन सिझनमध्ये भयानक हत्येची कहाणी दाखवण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.