‘रामायणा’तील ‘रावणा’च्या निधनाची अफवा, ‘लक्ष्मण’ सुनील लहरींनी सांगितली सत्य परिस्थिती

देशभरात सध्या कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरते आहे. या कोरोना साथीच्या युगात लोक सतत आपल्या प्रियजनांना मुकत आहेत. दरम्यान, अनेक कलाकारांच्या निधनाच्या अफवा देखील सातत्याने पुढे येत आहेत.

‘रामायणा’तील ‘रावणा’च्या निधनाची अफवा, ‘लक्ष्मण’ सुनील लहरींनी सांगितली सत्य परिस्थिती

मुंबई : देशभरात सध्या कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरते आहे. या कोरोना साथीच्या युगात लोक सतत आपल्या प्रियजनांना मुकत आहेत. दरम्यान, अनेक कलाकारांच्या निधनाच्या अफवा देखील सातत्याने पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत प्रसिद्ध टीव्ही शो ‘रामायणा’मध्ये (Ramayan) रावणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) यांच्या निधनाची बातमी समोर आली असून, या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता (Ramayan Ravan Fame Actor Arvind Trivedi death rumor Sunil lahiri gives clarification).

अलीकडेच अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. पण आता ‘रामायणा’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सुनील लहरी (Sunil Lahiri) यांनी हे वृत्त अफवा असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहे.

सुनील लाहिरी यांनी सांगितले सत्य

अभिनेता सुनील लहरीने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यात अरविंद यांचा रामायणच्या दिवसातील एक फोटो आहे जेव्हा ते रावणाची भूमिका साकारत होते, तर दुसऱ्या फोटोमध्ये सुनील आणि अरविंद एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

हे फोटो शेअर करण्याबरोबरच सुनीलने लिहिले आहे की, कोरोनामुळे आजकाल सतत वाईट बातम्या ऐकू येत आहेत, वरुन अरविंद त्रिवेदीजी (रावण) यांच्याबाद्द्ल खोटी बातमी, खोटी अफवा पसरविणाऱ्यांना लोकांना माझी प्रार्थना आहे की, त्यांनी अशा प्रकारच्या बातम्या पसरवू नये, भगवंताच्या दयेने अरविंद जी पूर्ण ठीक आहेत आणि देव त्यांना नेहमी निरोगी ठेवो ही प्रार्थना.’(Ramayan Ravan Fame Actor Arvind Trivedi death rumor Sunil lahiri gives clarification)

पाहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Lahri (@sunil_lahri)

सुनील यांनी आपल्या पोस्टवरून हे स्पष्ट केले आहे की, अरविंद पूर्णपणे ठीक आहेत आणि त्यांच्या निधनाबद्दल जी बातमी पसरवली जात आहे, ती फक्त एक अफवा आहे. त्यांची ही पोस्ट पाहून लोकांना दिलासा मिळाला आहे. यावर सीताची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया यांनीही हात जोडलेले इमोजी शेअर करुन त्याबद्दल आभार मानले आहेत.

रामानंद सागर यांनी बनवलेल्या या ‘रामायणा’त अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका प्रभावीपणे साकारली होती. त्यांनी अशी भूमिका केली होती की त्यांची आजपर्यंत तीच प्रतिमा लोकांच्या नजरेसमोर राहिली आहे. अरविंद बर्‍याच दिवसांपासून पडद्यापासून दूर होते आणि आता तो खूप वृद्ध देखील झाले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाला आणि पुन्हा रामायण प्रसारित झाले, तेव्हा रामायण पाहून अरविंदंचे फोटो खूप व्हायरल झाले. रामायणातील सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला होता. आजही लोकांमध्ये रामायणाची क्रेझ अजिबात कमी झालेली नाही.

(Ramayan Ravan Fame Actor Arvind Trivedi death rumor Sunil lahiri gives clarification)

हेही वाचा :

‘Koo तुमच्या घरासाखे बाकी सगळे भाड्याचे’, ट्विटरवरून निलंबित होताच कूने केले कंगनाचे स्वागत!

Drishyam 2 | ‘दृश्यम 2’च्या घोषणेनंतर अडचणीत सापडला चित्रपट, निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI