एअरपोर्टवर योगायोगाने अनेक वर्षांनी भेटले रणबीर अन् दीपिका; एकमेकांना मिठी मारली अन्…. व्हिडिओ व्हायरल
दिल्ली विमानतळावर दीपिका आणि रणबीरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. विमानतळावर ही जोडी योगायोगाने भेटले तेव्हा दीपिका आणि रणबीरने इतक्या काळाने भेटल्याने आनंदाने कमेकांना मिठी मारली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील जोडी जिच्या अफेअर्सच्या चर्चा आजही होतात ती म्हणजे रणबीर अन् दीपिका. या दोघेही आपापल्या आयुष्यात खूप व्यस्त आहेत. पण तरी देखील या जोडीबद्दल चाहत्यांना तिच आपुलकी आहे. चित्रपटात आजही या जोडीला एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. दरम्यान रणबीर आणि दीपिका सध्या त्याच्या आयुष्यात चित्रपट तसेच वैयक्तिक गोष्टींमुळे व्यस्त असल्याने चित्रपटांमध्येदेखील तसेच कोणत्याही कार्यक्रमात पुन्हा एकत्र दिसले नाही. मात्र शनिवारी मुंबई विमानतळावर रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण अनेक वर्षांनी एकत्र दिसले.
रणबीर-दीपिकाचा भेटीचा व्हिडीओ व्हायरल
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “कलकी 2898 एडी” या बहुप्रतिक्षित चित्रपटानंतर दीपिका दिसली. व्हायरल व्हिडिओमध्ये, रणबीरने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. तो थेट कारमधून उतरून विमानतळ टर्मिनलकडे गेला. एअरपोर्टवर योगायोगाने त्याची आणि दीपिकाची भेट झाली.
View this post on Instagram
भेटल्यावर एकमेकांना मारली मिठी
व्हायरल झालेल्या विमानतळ क्लिपमध्ये रणबीर कपूर विमानतळावर येतो, तेव्हा दीपिका इलेक्ट्रिक शटलमध्ये असते.अचानक एकमेकांना पाहताच, रणबीर आणि दीपिका एकमेकांना हात दाखवतात. चेकींगनंतर रणबीरही तिच्यासोबत इलेक्ट्रिक शटलमध्ये जाऊन बसतो. तेव्हा ते हसत एकमेकांना मिठी मारतात आणि नंतर रणबीर तिच्यासोबत बसून बाहेर येतो. इंटरनेटवरील या व्हायरल क्लिपने चाहत्यांना पुन्हा एकदा या जोडीची आठवण झाली.
चाहत्यांना पुन्हा एकदा या जोडीला पाहून आनंद झाला
दिल्ली विमानतळावरील आणखी एका व्हिडिओमध्ये हे दोघेही नंतर ते एकत्र बाहेर पडले. तेव्हाही त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि नंतर त्यांच्या त्यांच्या कारमधून ते निघून गेले. रणबीर त्याच्या स्नीकर ब्रँड, आर्क्सच्या दिल्ली आउटलेटच्या उद्घाटनासाठी गेला होता. ज्याचा उल्लेख त्याने गेल्या आठवड्यात त्याच्या वाढदिवशी चाहत्यांशी इंस्टाग्राम लाईव्ह संवादादरम्यान केला होता.
या जोडीला एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक
2015 च्या तमाशा चित्रपटानंतर त्यांनी एकत्र काम केलेले नसल्यामुळे चाहते त्यांना एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत. अयान मुखर्जीच्या ‘ये जवानी है दिवानी’ मध्ये नैनाच्या भूमिकेत दोघांनाही चांगलेच पसंती मिळाली होती. आता, त्यांना एकत्र पाहून चाहते आशा करत आहेत की ते ‘ये जवानी है दिवानी 2’ मध्ये एकत्र दिसतील.
