हा बॉलिवूड अभिनेता 15 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या माधुरीच्या प्रेमात वेडा होता; तिचे लग्न झालं तेव्हा ढसाढसा रडला
'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचे लाखो फॅन आहेत. पण एक अभिनेता माधुरीच्या प्रेमात वेडा होता. तो तिचा इतका मोठा चाहता होता की जेव्हा माधुरीचे लग्न झाले हे त्याला समजले तेव्हा तो ढसाढसा रडला होता. त्याला खूप दु:ख झालं होतं.हा अभिनेता आज बॉलिवूडचा टॉपचा सेलिब्रिटी आहे.

बॉलिवूडमधील ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित ही लाखो दिलों की धडकन आहे. तिचे चाहते हे कित्येक कलाकारही आहेत. आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षितचे लाखो चाहते आहेत. आजही जेव्हा माधुरी कोणत्याही रिअॅलिटी शो किंवा चित्रपटात डान्स स्टेप करते तेव्हा तिच्या चाहत्यांचे हृदय जोरात धडधडू लागते. एक सुंदर अभिनेत्री असण्यासोबतच, तिच्या अभिनयामुळे तिने सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.
अभिनेता जो माधुरीच्या प्रेमात वेडा होता
माधुरी चित्रपटांमुळे जशी चर्चेत राहिली आहे तशीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. माधुरीचे काही कलाकारांसोबत नावही जोडले गेले होते,मात्र तिने लग्न तिच्या घरच्यांच्या पसंतीच्या मुलाशी म्हणजेच डॉक्टर नेनेंशी केले. पण तु्म्हाला माहितीये का की एक अभिनेता असा आहे जो माधुरीच्या प्रेमात वेडा होता. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. आणि जेव्हा त्याला समजलं की तिचे लग्न झाले तेव्हा ढसाढसा रडला होता. हा अभिनेता कपूर घराण्यातील एक मोठं नाव आहे.
View this post on Instagram
माधुरीचे लग्न झाले तेव्हा तो ढसाढसा रडला होता
‘सावरिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा रणबीर कपूर. त्याचे नाव भलेही अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले असेल, पण तो माधुरीच्या प्रेमात वेडा होता. एका मुलाखतीत रणबीरने स्वत: याबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला होता की, ‘मी माधुरीचा खूप मोठा चाहतो आहे, मी तिचेच स्वप्न पाहायचो. पण जेव्हा तिचे लग्न झाले तेव्हा मी खूप रडलो, पण लग्नानंतर जेव्हा ती चित्रपटांमध्ये परतली तेव्हा माझ्या चेहऱ्यावर हास्य परतले.’ ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात रणबीर आणि माधुरीने ‘घागरा’ हा गाण्यावर डान्सही केला आहे. माधुरीसोबत काम करणं म्हणजे त्याच्यासाठी कोणत्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते. दरम्यान या गाण्यातील त्यांची केमिस्ट्री देखील लोकांनाही खूप आवडली होती.
आजही तो माधुरीचा मोठा चाहता
माधुरीने रणबीर कपूरचे स्टार वडील ऋषी कपूर यांच्यासोबत प्रेम ग्रंथ सारखा सुपरहिट चित्रपटही दिला आहे. याशिवाय ही जोडी ‘याराना’ आणि ‘साहेबान’ मध्येही दिसली होती. माधुरी आज 57 वर्षांची आहे, तर रणबीर 42 वर्षांचा आहे. 1999 मध्ये तिने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. त्यावेळी रणबीर 17 वर्षांचा होता आणि अभिनेत्री 32 वर्षांची होती. पण रणबीर आजही मोठा चाहता म्हणून माधुरीसाठी तेच प्रेम आणि आदर मनात बाळगतो.
