इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ-अदिती रावचं असंही प्रेम; चाहत्यांनी विचारलं ‘लग्न कधी करताय’?

'रंग दे बसंती' फेम सिद्धार्थशी अदिती राव हैदरी करणार लग्न?

इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ-अदिती रावचं असंही प्रेम; चाहत्यांनी विचारलं 'लग्न कधी करताय'?
Siddhart and Aditi RaoImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 1:10 PM

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांच्या रिलेशनशिपची सध्या जोरदार चर्चा आहे. अदितीच्या वाढदिवशी सिद्धार्थने पहिल्यांदाच तिच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तेव्हापासून चाहते या दोघांना लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारत आहेत. सिद्धार्थने नुकताच पांढऱ्या स्वेटशर्टमधला एक फोटो पोस्ट केला. विशेष म्हणजे काही काळापूर्वी अदितीनेही याच स्वेटशर्टमधला फोटो शेअर केला होता. त्यामुळे चाहते दोघांचे फोटो एकत्र करत सोशल मीडियावर त्यांना लग्नाबद्दल प्रश्न विचारत आहेत.

हे सुद्धा वाचा

सिद्धार्थ हा सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. मात्र सोमवारी जेव्हा त्याने इन्स्टाग्रामवर सेल्फी शेअर केला, तेव्हा चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. या सगळ्यात अदितीच्या कमेंटनेही चाहत्यांचं लक्ष वेधलं. ‘इन्स्टाग्रामवर ईदचा चंद्र’ अशी कमेंट तिने केली. सिद्धार्थच्या या फोटोवर फराह खानसह इतरही काही सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत.

सिद्धार्थ आणि अदिती हे ‘महा समुद्रम’ या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले असं म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वीच या दोघांना मुंबईत एकत्र पाहिलं गेलं होतं. अदितीच्या वाढदिवशी त्याने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. ‘हृदयाच्या राजकुमारीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे सर्व लहान, मोठे आणि न पाहिलेली स्वप्नंसुद्धा पूर्ण होवोत’, अशा शब्दांत त्याने तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

सिद्धार्थचं नाव याआधी बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. समंथा रुथ प्रभू, सोहा अली खान आणि श्रुती हासन यांचंसुद्धा सिद्धार्थसोबत नाव जोडलं गेलं होतं. 2003 मध्ये सिद्धार्थने बालमैत्रीण मेघनाशी लग्न केलं होतं. मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.