रणवीर अलाहाबादीयाला धमकी, आईच्या क्लिनिकपर्यंत पोहोचले लोकं…, धक्कादायक प्रकार समोर
Ranveer Allahabadia: रणवीर अलाहाबादीयाला जीवे मारण्याची धमकी, आईच्या क्लिनिकमध्ये कसे पोहोचले लोकं? धक्कादायक प्रकार समोर... पोस्ट करत खुद्द रणवीर यानेच सांगितला घडलेला धक्कादायक प्रकार

Ranveer Allahabadia: समय रैना याच्या शोमध्ये आई – वडिलांवर वादग्रस्त वक्तव्य करणं युट्यूबर रणवीर अलाहाबादीया याला चांगलंच महागात पडलं आहे. शो वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे युट्यूबने सर्व व्हिडीओ हटवले आहे. आता व्हिडीओमध्या सामिल असलेल्या सर्वांना केलेल्या विनोदाची चांगलीच किंमत मोजावी लागत आहे. आरणवीर अलाहाबादियानंतर ता या व्हिडिओचा भाग असलेल्या अपूर्व माखिजालाही जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. काही काळ YouTuber रणवीर अलाहाबादियाने प्रकरणावर मौन बाळगलं होतं. पण नंतर त्यानी व्हिडीओ पोस्ट करत माफी देखील मागितली. शिवाय सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत… असं देखील रणवीर याने सांगितलं.
काय म्हणाली अपूर्वा मखीजा?
सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर अपूर्वा मखीजा देखील या प्रकरणात अडकली आहे. मुंबई आणि आसाम याठिकाणी अपुर्वा विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. रणवीर याने विनोद केला तेव्हा अपुर्वा देखील हसताना दिसली. या कारणामुळे तिला देखील अनेकांनी अडचणीत आणलं आहे. अपुर्वा हिला देखील जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.
View this post on Instagram
यूट्यूबर अपूर्व माखिजा बद्दल असे समोर आले आहे की तिला लैंगिक छळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. तिचा लाइन छळही होत आहे. सध्या संबंधित प्रकरणामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे.
रणवीरच्या आईच्या क्लिनिकमध्ये पोहोचले विरोधक
सांगायचं झालं तर, याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. रणवीरसह 30 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणी रणवीरला सातत्याने धमक्या येत आहेत. त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबालाही धमक्या येत आहेत.
रणवीरने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. आजारपणाच्या बहाण्याने लोक त्याच्या आईच्या क्लिनिकमध्ये येतात आणि धमक्या देत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. यामुळे रणवीर चिंतेत असून त्याने आपल्या कृत्याबद्दल सर्वांची माफीही मागितली आहे.