रणवीर अलाहाबादियाचे खरे नाव काय माहितीये? पाकिस्तानशीही आहे एक कनेक्शन
सध्या चर्चेत असलेल्या रणवीर अलाहाबादियाचे खरे आडनाव हे वेगळंच असून त्याचा पाकिस्तासोबतही कनेक्शन आहे. रणवीर यूट्यूबर आणि पॉडकास्टर आहे. मात्र 'इंडियाज गॉट टॅलेंट'वरील वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका होत आहे.

रणवीर अलाहाबादियाचं नाव आता जरा जास्तच चर्चेत आहे. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये त्याने पालकांबाबात केलेल्या एक अश्लील वक्तव्यामुळे तो चांगलाच वादात सापडला आहे. त्यावरून रणवीरने भलेही माफी मागितली असली तरीही त्याच्यावर फक्त राग आणि संतापच व्यक्त केला जात आहे.
रणवीर अलाहाबादियाचं खरं नाव माहितीये?
पण हे फार कमी जणांना माहित असेल की, रणवीर अलाहाबादियाचं खरं आडनाव दुसरंच असून त्याचं कनेक्शन खरंतर पाकिस्तानशी आहे. होय, हे खरं आहे. याबद्दल त्याने स्वत:च खुलासा केला होता. “बीअर बायसेप्स” या त्याच्या यूट्यूब चॅनलसाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि आताचा प्रसिद्ध पॉडकास्टर असलेला रणवीर अलाहाबादियाचे खरे नाव रणवीर सिंग अरोरा आहे. पण तो त्याच्या नावापुढे अलाहाबादिया लावतो.
रणवीरचे पाकिस्तानशी काय संबंध?
रणवीरचे कुटुंब खूप वर्षांपूर्वी पाकिस्तानहून भारतात आलेले आहेत. त्यांच्या कुटुंबाला पाकिस्तानमध्ये ‘इलमवादी’ ही पदवी मिळाली. याचा अर्थ बुद्धिमान किंवा विद्वान असा होतो. भारतात आल्यानंतर हे नाव त्यांनी बदललं. जेव्हा रणवीरचे कुटुंब भारतात आलं तेव्हा त्यांचं आडनाव त्यांनी अलाहाबादिया (इलाहबादिया) करून घतेलं. तेव्हापासून त्याच्या कुटुंबाने हेच नाव पुढे सुरु ठेवलं.
रणवीर त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून दरमहा लाखो कमावतो
दरम्यान, रणवीरने वयाच्या 22 व्या वर्षी युट्यूबवर म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. रणवीरचे बरीच यूट्यूब चॅनेल्स आहेत असं म्हटलं जातं. त्यापैकी एक बीअर बायसेप्स आहे. या सर्व चॅनेलचे मिलीअन्सने सबस्क्राईबर्स आहेत. रणवीर त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून दरमहा 35 लाख रुपये कमावतो. याशिवाय, ब्रँड एंडोर्समेंट आणि रॉयल्टीमधूनही त्याला उत्पन्न मिळते. 2024 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 60 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.
‘इंडियाज गॉट लेलेंट’च्या एका भागात रणवीरने जो अश्लील विनोद केला त्यानंतर मात्र त्याच्या या चांगल्या प्रतिमेला तडा गेला. आता सर्वत्र त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. रणवीर आणि समय तसेच त्याच्या शोवर अनेक कायदेशीर तक्रारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान हा एपिसोडही नंतर काढून टाकण्यात आला आहे. पण हा वाद आता दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.
