AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीर सिंहचा 83 चित्रपट ‘या’ तारखेला होऊ शकतो प्रदर्शित !

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली आहे. आता यानुसार देशाभरातील सर्वच चित्रपटगृहे 100 टक्के क्षमतेसह सुरू झाली आहेत.

रणवीर सिंहचा 83 चित्रपट 'या' तारखेला होऊ शकतो प्रदर्शित !
| Updated on: Feb 09, 2021 | 9:10 AM
Share

मुंबई : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली आहे. आता यानुसार देशाभरातील सर्वच चित्रपटगृहे 100 टक्के क्षमतेसह सुरू झाली आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मार्चमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. ज्यामुळे अनेक चित्रपटांची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आल्या होत्या. (Ranveer Singh’s 83 films may be released on June 25)

बिग बजेटच्या चित्रपटांना यामुळे फटका बसला आहे. आता चित्रपटगृहे पुर्ण क्षमतेसह उघडली आहेत. त्यानंतर, निर्मात्यांनी त्यांचा मोठ्या बजेटचे चित्रपट रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे. अलीकडेच अक्षय कुमारच्या सूर्यवंशी चित्रपटाची रिलीज तारीख जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर आता रणवीर सिंहच्या 83 चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची घोषणा करण्याची शक्यता आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, निर्माते 83 चित्रपटाची रिलीज तारीख जूनमध्ये घोषित करू शकतात. आता परिस्थिती हळूहळू सामान्य होत चालली आहे, प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर चित्रपट प्रदर्शित करण्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत सूर्यवंशी 2 एप्रिल रोजी रिलीज होऊ शकतो. त्याचबरोबर, रमजान 12 एप्रिलपासून सुरू होत आहे, ज्यामुळे या महिन्यात 83 रिलीज होऊ शकत नाही. मे महिन्यामध्ये दोन मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत, राधे आणि सत्यमेव जयते 2, त्यामुळे या महिन्यातही हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही.

अशा परिस्थितीत निर्मात्यांनी हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते आहे. 25 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. रणवीर सिंहचा हा चित्रपट ’83’ एप्रिल 2020 मध्ये रिलीज होणार होता पण लॉकडाऊनमुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. रिलायन्स एंटरटेनमेंटच्या हा एकच नव्हे तर दोन बिग बजेट चित्रपट रिलीजची वाट पहात होते. त्यामध्ये रणवीर सिंगची 83 आणि अक्षय कुमारचा सूर्यवंशी हे दोन चित्रपट आहेत.

या अगोदर होळीच्या निमित्ताने सूर्यवंशीच्या रिलीजचे नियोजन करण्यात आले होते, पण हॉलिवूड अ‍ॅक्शन चित्रपट गॉडजिला वर्सेज कॉन्ग रिलीजच्या तारखेमुळे गडबड झाली. रिलायन्स एंटरटेनमेंट 83 हा चित्रपट 1983 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या कहाणीवर आधारित आहे. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत.

83 चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. या चित्रपटात रणवीर सिंहने माजी भारतीय क्रिकेट कपिल देव म्हणूनची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कपिल देवच्या पत्नीची भूमिका दीपिका पादुकोण साकारत आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात इतरही मोठे चेहेरे दिसणार आहेत.

संबंधित बातम्या : 

दिलजितने पुन्हा घेतला कंगनासोबत ‘पंगा’, म्हणाला…

मी जिवंत आहे, माझ्या मृत्यूची बातमी फेक: अभिनेता मोहन कपूर

VIDEO: शांत रहाणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं, नसीरुद्दीन शाह यांची मोदी सरकारवर टीका

(Ranveer Singh’s 83 films may be released on June 25)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.