रणवीर सिंहच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ’83’ चित्रपट या तारखेला रिलीज होणार!

| Updated on: Feb 20, 2021 | 12:07 PM

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मार्चमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. ज्यामुळे अनेक चित्रपटांची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

रणवीर सिंहच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; 83 चित्रपट या तारखेला रिलीज होणार!
Follow us on

मुंबई : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मार्चमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. ज्यामुळे अनेक चित्रपटांची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आल्या होत्या. बिग बजेटच्या चित्रपटांना यामुळे फटका बसला आहे. आता चित्रपटगृहे पुर्ण क्षमतेसह उघडली आहेत. त्यानंतर, निर्मात्यांनी त्यांचा मोठा बजेटचे चित्रपट रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये आता एक नवीन बातमी पुढे आली आहे. (Ranveer Singh’s 83 films will be released on June 4)

रिलायन्स एंटरटेनमेंटचा ’83’ चित्रपटाची रिलाज तारीख पुढे आली आहे. रणवीर सिंगचा चित्रपट ’83’ यंदा 4 जूनला प्रदर्शित होईल. रणवीर सिंगने सोशल मीडियावर याची माहिती देत चाहत्यांना खूश केले आहे. रणवीर सिंहचा हा चित्रपट ’83’ एप्रिल 2020 मध्ये रिलीज होणार होता पण लॉकडाऊनमुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. 83 चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे.

चित्रपट क्रिकेटर कपिलदेवची बायोपिक असून 1983 च्या वर्ल्ड कपवर याची कहाणी आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देवची भूमिका साकारत आहे. सुनील गावस्करची भूमिका ताहिरराज भसीन साकारणार आहे. याशिवाय साकीब सलीम मोहिंदर अमरनाथ, सय्यद किरमानी म्हणून साहिल खट्टर, मदन लालच्या भूमिकेत हार्डी संधू आणि चिराग पाटील यांच्या भूमिकेत संदीप पाटील असणार आहे.

कपिल देवच्या पत्नीची भूमिका दीपिका पादुकोण साकारत आहे. पहिल्यांदाच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग एका चित्रपटात दिसणार आहेत. यामुळे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. एका मुलाखतीदरम्यान रणवीर कपूरने सांगितले होते की, माझ्या लहानपणापासूनच मला क्रिकेटची क्रेझ सुरू होती. दिग्दर्शक कबीर खान माझ्याकडे आले आणि म्हणाले की, ते 83 वर एक चित्रपट बनवणार आहे आणि मला चित्रपटाची कहाणी आवडली आणि मी लगेचच होकार दिला.

संबंधित बातम्या : 

Shershaah | सिद्धार्थ-कियाराचा शेरशाह चित्रपट ‘या’ तारखेला रिलीज होणार!

श्वेता तिवारीविरोधात पती अभिनवची कोर्टात धाव, मुलाला भेटू न देण्याचा आरोप!

अक्षयची ‘बेल बॉटम’ दहशतवादी घटनेवर आधारीत; वाचा चित्रपटाची कहाणी! 

(Ranveer Singh’s 83 films will be released on June 4)