AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राकेश बापटच्या पूर्व पत्नीचं लग्नावर मोठं वक्तव्य; म्हणाली, ‘फेयरिटेलसारख्या लग्नाची अपेक्षा कधीच…’

Raqesh Bapat Ex Wife Ridhi Dogra : 'फेयरिटेलसारख्या लग्नाचा अपेक्षा कधीच...', घटस्फोटानंतर राकेश बापट याच्या पूर्व पत्नीचं लग्नाबद्दल मोठं वक्तव्य, असं का म्हणाली अभिनेत्री?

राकेश बापटच्या पूर्व पत्नीचं लग्नावर मोठं वक्तव्य; म्हणाली, 'फेयरिटेलसारख्या लग्नाची अपेक्षा कधीच...'
| Updated on: May 24, 2026 | 8:04 AM
Share

Raqesh Bapat Ex Wife Ridhi Dogra : अभिनेता राकेश बापट याची पूर्व पत्नी अभिनेत्री रिद्धी डोगरा हिची एक सोशल मीडिया पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. रिद्धी हिने सध्या घडीला होणाऱ्या लग्नांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून मॉडेल ट्विशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील प्रकरणावर संताप व्यक्त केला. यावर आता रिद्धी हिने वास्तव सांगत मुलींनी आत्मनिर्भर होण्यास सांगितलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने स्त्रीवादचा खरा अर्थ देखील सांगितला.

इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत रिद्धी म्हणाली, ‘तरुण मुलं आणि मुली हे 2026 आहे… कृपया लग्नाला गरजेपेक्षा अधिक रोमँटिक बनवू नका… आता लग्न पूर्वी सारखे राहिलेले नाहीत… मुलांना आता कळलं पाहिजे की मुली आता प्रत्येक गोष्टीवर डोळे बंद करुन विश्वास ठेवणार नाहीत. कारण कायद्याने आणि समाजाने मुलींना सशक्त बनवलं आहे… मुली आता समाजात सन्मानाने जगू शकतात. त्यामुळे जीवन जगण्यासाठी त्यांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आता मुलींना लग्नाची गरज आयुष्य चालवण्यासाठी नाही.’

View this post on Instagram

A post shared by Ridhi Dogra (@iridhidogra)

पुढे रिद्धी म्हणते, ‘मुलींनी कृपया अशी अपेक्षा करू नका की, लग्न फेयरिटेलसारखं असेल… तुमचा बॉयफ्रेंड कोणता मिस्टर परफेक्ट नाही. तो सुद्धा एक माणूक आहे आणि नव्या विश्वात तो स्वतःला सामावून घेत आहे. समजावून घेत आहे… कारण कारण त्यांनी एक वेगळा समाज पाहिला आहे, जिथे पुरुषांकडून वेगळ्या अपेक्षा ठेवल्या जात होत्या. पुन्हा सांगतो, एखाद्या परीकथेसारख्या लग्नाची अपेक्षा करू नका. स्वतःला शिक्षित करा. स्वतःसाठी जगायला आणि स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहायला शिका. प्रेम आणि आदरासाठी लग्न करा.’

लग्नात दुसऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीबद्दल देखील रिद्धी हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘तुमच्या वैवाहिक आयुष्यात कायम आई – वडील किंवा दुसऱ्यांना आणू नका. जर तुम्हाला तुमचे निर्णय घेण्यासाठी दुसऱ्यांची गरज भासत असेल तर, ते लग्न तुम्हा दोघांचं नाही तर संपूर्ण गर्दीचं आहे…’ असं देखील रिद्धी तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!