AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रश्मिका मंदाना हिचा का चढला पार, लांबलचक पोस्ट करत म्हणाली, महिलांना टारगेट केलं जातं आणि…

Rashmika Mandanna : महिलांना टारगेट केलं जातं आणि..., इंटरनेटवर महिलांसोबत सर्रास घडणाऱ्या वाईट गोष्टीवर रश्मिका मंदाना हिच्याकडून संताप व्यक्त..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

रश्मिका मंदाना हिचा का चढला पार, लांबलचक पोस्ट करत म्हणाली, महिलांना टारगेट केलं जातं आणि...
Rashmika Mandanna
| Updated on: Dec 03, 2025 | 9:19 PM
Share

Rashmika Mandanna : इंटरनेटमुळे प्रगती होत आहे आणि जग जवळ आलं आहे कारण इंटरनेटने जगातील लोकांना एकत्र आणलं आहे… शिवाय अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहे.. पण नाण्याला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात, त्याच प्रमाणे इंटरनेटच्या देखील दोन बाजू आहेत. वाईट बाजू म्हणजे AI च्या माध्यमातून तयार होणार अश्लील फोटो आणि व्हिडीओ… यावर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने संताप व्यक्त केला आहे… सेलिब्रिटींनी एआयच्या गैरवापरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कलाकारांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाच्या गैरवापराविरुद्ध आवाज उठवला आहे. एकेकाळी डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेल्या रश्मिका हिने इंटरनेटच्या गैरवापराविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

रश्मिका मंदाना हिने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रश्मिकाने तिच्या अधिकृत एक्स हँडलवर या प्रकरणासंदर्भात एक ट्विट शेअर केलं आहे. शिवाय महिलांना टारगेट केलं जात आहे… असं देखील रश्मिका म्हणाली आहे…

ट्विट करत रश्मिका म्हणाली, ‘जेव्हा सत्य निर्माण करता येते, तेव्हा समज ही सर्वात मोठी सुरक्षितता बनते. प्रगतीसाठी एआय हे एक उत्तम साधन आहे. पण याचा उपयोग अश्लीलता पसरवण्यासाठी आणि विशेषतः महिलांना टारगेट करण्यासाठी केला जातो… काही लोकांची मानसिकता याठिकाणी दिसून येते… इंटरनेट आसा सत्याचा आरसा राहिलेला नाही..’

‘इंटरनेट आता एक कॅनव्हस आहे, जेथे काहीही तयार केलं जाऊ शकतं.. अधिक प्रगतीशील समाज निर्माण करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करा, परंतु त्याचा गैरवापर टाळा. निष्काळजीपणाऐवजी जबाबदारी निवडा. जर लोक माणसांसारखे वागू शकत नसतील तर त्यांना कठोर आणि अक्षम्य शिक्षा झालीच पाहिजे.’ असं देखील अभिनेत्री संतापात म्हणाली आहे.

रश्मिका मंदाना हिचे सिनेमे

रश्मिका हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, यंदाच्या वर्षी अभिनेत्री ‘सिकंदर’, ‘छावा’, ‘थामा’ आणि ‘द गर्लफ्रेंड’ या सिनेमांमध्ये दिसली… येणाऱ्या वर्षात देखील मोठ्या पडद्यावर रश्मिकाचा बोलबाला असणार आहे… सध्या रश्मिका ‘कॉकटेल’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 2026 मध्ये सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल अशी माहिती समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून रश्मिका तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. रश्मिका हिने अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत गुपचूप साखरपुडा उरकल्याची माहिती देखील समोर आहे. अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं देखील कळत आहे. पण यावर दोघांनी देखीव मौन बाळगलं आहे..

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.