AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अण्णा नाईक आहेत ते, परत येणारच’, मुंबईच्या लोकलमध्येही घुमला अण्णा नाईकांचा आवाज!

पहिल्या दोन पर्वांप्रमाणेच या तिसऱ्या पर्वतही तितके गूढ वातावरण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान, सगळीकडे ‘अण्णा नाईक परत येणार...’, ही चर्चा सुरु आहे.

‘अण्णा नाईक आहेत ते, परत येणारच’, मुंबईच्या लोकलमध्येही घुमला अण्णा नाईकांचा आवाज!
अण्णा नाईक
| Edited By: | Updated on: Mar 17, 2021 | 9:03 AM
Share

मुंबई : ‘कोकणातली भूता लई वाईट, एकदा का झाड धरल्यानी की सोडनात नाय…’, ही टॅगलाईन तुमच्या आठवणीत असेलच! अगदी बरोबर! सगळ्यांची आवडती मालिका अर्थात ‘रात्रीस खेळ चाले’चे तिसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या दोन पर्वांप्रमाणेच या तिसऱ्या पर्वतही तितके गूढ वातावरण प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान, सगळीकडे ‘अण्णा नाईक परत येणार…’, ही चर्चा सुरु आहे. आता तर थेट मुंबई लोकलमध्येही अण्णा नाईक दिसले आहेत (Ratris Khel Chale 3 latest promo Anna Naik in Mumbai local).

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या आगामी पर्वाचा एक लक्षवेधी प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मंबईच्या लोकलमधला रात्रीचा हा प्रसंग आहे. सर्व प्रवासी गप्पा-गोष्टींमध्ये गुंग असतानाच, त्यांना ट्रेनच्या सर्व डब्ब्यांवर ‘अण्णा नाईक परत येणार…अण्णा नाईक परत येणार..’, असे लिहलेले पहायला मिळतेय. हे पाहून प्रत्येक जण अण्णा नाईकांची खिल्ली उडवतो. तेवढ्यात अचानक बाहेर खिडकीतून अण्णा नाईक दिसतात आणि त्यांचा दरारासुध्दा पाहायला मिळतो. सर्वच प्रवाशी क्षणार्धात दचकतात. तर, खिडकीतूनच ‘अण्णा नाईक परत येणार…’ म्हणत अण्णा वाऱ्याच्या वेगाने गायब होतात.

पाहा ‘हा’ भन्नाट प्रोमो!

(Ratris Khel Chale 3 latest promo Anna Naik in Mumbai local)

या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मालिका कशी असणार आहे, याची झलक पाहायला मिळतेय, पहिल्यांदाच हा प्रोमो पाहणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. याचाच अर्थ यंदाच्या पर्वात अण्णा नाईकांचा दरारा आणि भय आणखी वाढणार आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाला उदंड प्रतिसाद!

22 फेब्रुवारी 2016मध्ये चालू झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेन नुसता धुमाकूळ घातला होता. तळकोकणातल्या एका वाड्यातला नाईकांचा एक कुटुंब अस्सल मालवणी भाषेत प्रेक्षकांच्या समोर आले होते. अण्णा नाईकांच्या कुटुंबाची कथा सुरुवातीपासूनच गाजत होती. अण्णा, अण्णाची बायको, माधव, दत्ता, नीलिमा, सरिता, छाया आणि अभिराम ही पात्रं तर फेमस झाली, पण त्यापेक्षाही वरचढ ठरले पांडू, सुशल्या आणि शेवंता!(Ratris Khel Chale 3 latest promo Anna Naik in Mumbai local)

सुरुवातीला कोकणची बदनामी होते म्हणून मालिकेला विरोध झाला. पण जसजसे कथानक पुढे सरकत गेले, तसतसा हा विरोधही मावळत गेला. पहिल्या पर्वामध्ये पहिल्याच भागात अण्णा गेले, असे दाखवले आणि कथानक पुढे नेले होते. पण दुसऱ्या पर्वामध्ये मात्र अण्णांचा पूर्ण जीवनपटच दाखवला होता. या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच लोकांनी कार्यक्रमाला डोक्यावर घेतले होते. त्यामुळे आत तिसऱ्या पर्वाकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत.

कुठे आहे प्रसिद्ध नाईकांचा वाडा?

सिंधुदुर्गातल्या कुडाळ आकेरी मधल्या शेटकर यांच्या मालकीच्या वाड्यातच ‘रात्रीस खेळ चाले’चे चित्रीकरण चालते. यापूर्वी या वाड्यात ‘ महानंदा’ व ‘ गांरबीचा बापू’ या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले होते. सिंधुदुर्गातले अनेक नैसर्गिक सौंदर्याची लोकेशन्स, तसेच तिथल्या लोकांनी कल्पकतेने बांधलेली जुनी घरे सिने, मालिका निर्मात्यांना आकर्षित करतात. पहिल्या पर्वाचे चित्रीकरण सुरु असताना रोज शंभरच्या वर पर्यटक या वाड्याला भेट देत होते. आता मात्र नाईकांचा हा वाडा पर्यटन स्थळ म्हणूनच लोकप्रिय झाला आहे.

(Ratris Khel Chale 3 latest promo Anna Naik in Mumbai local)

हेही वाचा :

‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’च्या स्पर्धकाला चक्क प्रेक्षकानेच देऊ केली नोकरी, वाचा दीपक हुलसुरेची संघर्ष कथा…

आधी हातावर नावं गोंदवली, आता मात्र एकमेकांसोबत दिसणंही कठीण! शिव-वीणाच्या नात्यात ‘का रे दुरावा’?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.