AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छोटा अमिताभ’ मोठ्या व्यवसायाचा मालक, थेट 300 कोटींची उलाढाल!   

रवीने ‘देश प्रेमी’, ‘शक्ती’, ‘कूली’, ‘अमर अकबर अँथोनी’ सारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये अमिताभची व्यक्तिरेखा साकारली होती.

‘छोटा अमिताभ’ मोठ्या व्यवसायाचा मालक, थेट 300 कोटींची उलाढाल!   
| Updated on: Oct 23, 2020 | 5:55 PM
Share

मुंबई : मनोरंजन विश्वाचा ‘महानायक’ अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळावे, अशी सगळ्या कलाकारांची किंबहुना मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या प्रत्येकाची इच्छा असते. अनेक मोठे निर्माते-दिग्दर्शक-लेखक खास अमिताभ बच्चन यांना समोर ठेवून एखाद्या चित्रपटाची संहिता लिहितात. ‘केबीसी’च्या मंचावर सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी खऱ्या आयुष्यातही अनेकांना मदतीचा हात दिला आहे. चित्रपटसृष्टीत स्वतःचे हक्काचे स्थान मिळवत रसिकांच्या मनात घर करणाऱ्या ‘बिग बीं’न प्रमाणे, ‘छोट्या बिग बीं’नी (little Amitabh)  देखील मेहनतीने स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. एकेकाळी बाल ‘अमिताभ’ साकारणारा अभिनेता रवी वलेचा (Ravi valecha) आज तब्बल 300 कोटींचा मालक बनला आहे.(Ravi valecha a little Amitabh from movie becomes successful businessman)

सत्तर-ऐंशीच्या दशकांत चित्रपटांची कथा ही नायकाच्या जन्मापासून किंवा त्याच्या बालपणापासून सुरू व्हायची. कष्टप्रद, संघर्षमय आयुष्य जगणारा हा नायक, मोठा होऊन काहीतरी विशेष करून दाखवायचा. चित्रपटाची कथाच भासावी असा बदल एका बालकलाकाराच्या आयुष्यातदेखील झाला. मोठ्या पडद्यावर ‘छोटा अमिताभ’ साकारणारा अभिनेता रवी वलेचा आता एका मोठ्या कंपनीचा मालक बनला आहे.

अभिनेते रवी वलेचा यांनी अनेक चित्रपटात ‘बाल अमिताभ’ म्हणून काम केले आहे. 1976मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फकीरा’ या चित्रपटातून रवीने मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. ‘अमर अकबर अँथोनी’ या चित्रपटाने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. बघताच क्षणी लहानग्या अमिताभ प्रमाणे भासणाऱ्या रवीने ‘देश प्रेमी’, ‘शक्ती’, ‘कूली’, ‘अमर अकबर अँथोनी’ सारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये अमिताभची व्यक्तिरेखा साकारली होती. तब्बल 300हून अधिक चित्रपटांत बालकलाकाराची भूमिका करणाऱ्या रवीने त्याचवेळी मनोरंजन क्षेत्राला रामराम म्हटले. (Ravi valecha a little Amitabh from movie becomes successful businessman)

अभिनय सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित!

रवीने अभिनय सोडून आपला अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. पुढे जाऊन त्यांनी व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला.  कठोर परिश्रम आणि मेहनतीच्या जोरावर रवी यशस्वी उद्योजक बनला आहे.  त्याने अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूटमधून एमबीएची पदवी घेतली. त्यानंतर स्वत:ची कंपनीदेखील सुरू केली. हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात त्यांनी बरेच नाव कमावले आहे.

अभिनय क्षेत्रात यश मिळत असतानाच त्यांनी अभ्यासासाठी त्या क्षेत्राचा त्याग करण्याचा निर्णय घेतला होता. व्यवसाय उभा करतानाही त्यांना इतरांप्रमाणेच संघर्ष करावा लागला होता. परंतु, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी सगळ्या अडथळ्यांवर मात केली. या व्यवसायामुळेच ते आज तब्बल 300 कोटींचे मालक बनले आहेत. मनोरंजन क्षेत्राच्या झगमगाटीने हुरळून जाणऱ्या तरुण पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे.

(Ravi valecha a little Amitabh from movie becomes successful businessman)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.