जेव्हा रेखाने एका अवार्ड शोमध्ये अभिषेकला प्रेमाने किस केलं, अमिताभ बच्चन पाहतच बसले, अशी दिली प्रतिक्रिया
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेमकथेची चर्चा आजही रंगते. एका अवॉर्ड सोहळ्यात जेव्हा रेखा यांनी अभिषेक बच्चनला प्रेमाने किस केले, त्यावेळी अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया लक्षवेधी होती.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध आणि चर्चेत असणाऱ्या लव्ह स्टोरींमधील एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांची. जेव्हा अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीबाबत सर्वांना माहित आहे. आजही त्यांच्या प्रेमकथेबद्दल तेवढीच चर्चा होते.
ऐश्वर्या तर रेखाला आई मानते…
अमिताभ बच्चन आधीच जया बच्चनशी विवाहित होते. दोघांनीही सिलसिला, मुकद्दर का सिकंदर, दो अंजाने आणि मिस्टर नटवरलाल सारखे चित्रपट केले. तथापि, सिलसिला नंतर रेखा आणि अमिताभ यांनी एकत्र काम केले नाही किंवा ते कधीही कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात एकत्रित दिसले नाही. अमिताभ यांच्याशी जरी रेखा यांचा संपर्क नसला तरी त्यांचे जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायशी एगदीच जवळचे संबंध आहेत.ऐश्वर्या तर रेखाला आई मानते.
अनेक अवार्ड शोमध्ये रेखा ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्याशी गळाभेट करताना दिसतात. पण एका अवार्ड शोमध्ये रेखा यांनी जेव्हा अभिषेक बच्चनला प्रेमाने किस केलं तेव्हा मात्र अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
- rekha amitabh
जेव्हा रेखाने अभिषेकला प्रेमाने किस केले
या अवार्ड शोमध्ये अभिषेकसोबत त्याची पत्नी ऐश्वर्या आणि वडील अमिताभ बच्चन होते. रेखा प्रेमळ स्वभावासाठी ओळखल्या जातात. जेव्हा अभिषेक अवार्ड घ्यायला स्टेजवर गेला तेव्हा रेखा यांनी अभिषेकला प्रेमाने, मायेनं किस केलं. यावेळी अमिताभ यांच्यासोबत बसलेली ऐश्वर्या देखील हसू लागली आणि अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया मात्र पाहण्यासारखी होती. ते अभिषेक आणि रेखाकडे पाहत राहिले. यावेळी रेखा यांनी पिवळी साडी घातली होती आणि केसांचा आंबाडा घातला होता. त्यांनी अभिषेकच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत त्याला प्रेमाने किस केले.
रेखा आणि अमिताभ यांचे नाते
रेखा आणि अमिताभ एकमेकांशी रिलेशनशिपमध्ये होते असे म्हटले जाते पण त्यांनी ते कधीच सार्वजनिक केले नाही. तथापि, रेखाने सिमी ग्रेवालला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल उघडपणे सांगितले होते. मुलाखतीत सिमीने रेखाला अमिताभबद्दल विचारले तेव्हा रेखा म्हणाली, ” हा एक मूर्ख प्रश्न आहे. मला अद्याप एकही पुरूष, स्त्री, मूल भेटलेलं नाही जे स्वतःला अमिताभ यांच्या प्रेमात पूर्णपणे, उत्कटतेने, पडण्यापासून स्वत:ला रोखू शकले. सगळेच त्यांच्यावर प्रेम करतात मग मला का वेगळं केलं जावं? हे मी मान्य करायचं की मी त्याच्यावर प्रेम करत नाही? अर्थातच नाही. मी त्यांच्यावर प्रेम करते”