भाऊ शौविकसह रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा NCB ऑफिसमध्ये दाखल, वाचा नेमकं काय झालं…

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीने उघडकीस आणलेल्या ड्रग्स अँगलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) यांना अटक करण्यात होती.

भाऊ शौविकसह रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा NCB ऑफिसमध्ये दाखल, वाचा नेमकं काय झालं...
रिया आणि शौविक चक्रवर्ती
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 12:50 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एनसीबीने उघडकीस आणलेल्या ड्रग्स अँगलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) यांना अटक करण्यात होती. सध्या हे दोघेही जामिनावर तुरुंगबाहेर आहेत. मात्र, आज (5 एप्रिल) रिया आणि शौविक यांना पुन्हा एकदा मुंबईतील एनसीबी ऑफिसबाहेर स्पॉट केले गेले. एनसीबी कार्यालयाबाहेरील या दोघांचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत (Rhea Chakraborty And Showik Chakraborty spotted at NCB office).

जामिनावर बाहेर असले असले तरी हजेरी लावण्यासाठी रिया आणि शौविकला एनसीबी कार्यालयात जावं लागतं आहे. दर सोमवारी ही हजेरी लावली जाते. व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये रिया सलवार कमीजमध्ये दिसली आहे, तर शौविक जीन्ससह टी-शर्ट परिधान केलेला आहे. दोन्ही भावंडांनी मास्क परिधान केले होते.

पाहा पोस्ट

रिया आणि शौविकचा जामीन रद्द करण्याची एनसीबीची मागणी

रिया चक्रवर्ती हीचा जामीन रद्द करण्यासाठी एनसीबीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या सुनावणीत एनसीबीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, रिया चक्रवर्ती यांच्या जामिनावर त्यांचा कोणताही आक्षेप नाही. ते रिया चक्रवर्ती यांच्या जामिनाविरूद्ध नाही. मुंबई हायकोर्टाने काही प्रतिक्रिया दिली आहेत. त्याबद्दल तपास यंत्रणा सध्या चिंतित आहे. यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, सरकारने आणि एनसीबीने दुरुस्तीसह पुन्हा याचिका दाखल करावी (Rhea Chakraborty And Showik Chakraborty spotted at NCB office).

रियाचे निवेदन

रियाने हे मान्य केले होते की, ती घरात ड्रग्स आणत होती. नोव्हेंबर 2019मध्ये याची सुरुवात झाली. एवढेच नव्हे, तर रियाने यापूर्वीही शौविकला ड्रग्जसाठी निधी हस्तांतरित केला होता. ज्यामुळे आता एजन्सीने रियावर ड्रग्स खरेदी आणि पुरवठा केल्याचा आरोप केला आहे.

एनसीबीच्या आरोपपत्रात रियाचे नाव

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स अँगलचा तपास करत असताना एनसीबीने विशेष एनडीपीएस कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात रियासह 33 जणांवर आरोप केले गेले आहेत. या आरोपपत्रात रियावर एनडीपीएस कायद्याच्या कलम 27 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपपत्रात रियावर असा आरोप केला आहे, की रिया नोव्हेंबर 2019पासून सुशांतला ड्रग्स पुरवत होती.

अमिताभ बच्चनसोबत झळकणार!

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रिया चक्रवर्ती लवकरच चेहरे या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 9 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु देशात वाढत्या कोरोना प्रकरणामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. या चित्रपटात रियाबरोबर अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच चेहर्‍याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, रियाच्या चाहत्यांनी तिची एक झलक पाहायला मिळाली आहे.

(Rhea Chakraborty And Showik Chakraborty spotted at NCB office)

हेही वाचा :

Kangana Ranaut : कंगना आणि करण जोहर यांच्यातील वाद मिटला?, वाचा सविस्तर

Kapil Sharma | कपिल शर्माच्या मुलाचं नाव ऐकलंत का? ‘या’ नावाचा ‘विजया’शी आहे खास संबंध!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.