AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडवालो मराठी मुलगी येतेय… 2 तासांत रिंकू राजगुरुने केली कमाल, व्हिडीओ पाहून कराल कौतुक

Rinku Rajguru Dance Video Viral : 2 तासांत मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरुने केली कमाल... व्हिडीओ पाहून चाहत्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडवालो मराठी मुलगी येतेय... 2 तासांत रिंकू राजगुरुने केली कमाल, व्हिडीओ पाहून कराल कौतुक
Rinku Rajguru
| Updated on: Nov 23, 2025 | 3:14 PM
Share

Rinku Rajguru Dance Video Viral: ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कायम सिनेमा आणि मराठमोळ्या लूकमध्ये चर्चेत असणारी रिंकू आता खास कारणामुळे चर्चेत आली आहे. रिंकू हिने 2 तासांत अशी कमाल केली, ज्यामुळे रिंकू हिचं सर्वत्र कौतुक होत आहे. उत्तम अभिनय आणि डायलॉग बोलणाऱ्या रिंकू आता भन्नाट डान्स देखील करत आहे. सध्या रिंकू हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रिंकू डान्स करताना दिसत आहे. खुद्द रिंकू हिने डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

रिंकू हिने 22 नोव्हेंबर रोजी ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’ या सदाबहार गाण्यावर एक व्हिडिओ शेअर केला. तिने नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलसह हा परफॉर्मन्स सादर केला आहे. रिंकू हिचा भन्नाट डान्स, चेहऱ्यावरील हावभाव चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. जवळपास 62 वर्ष जुन्या गाण्यावर रिंकू-आशिषने त्यांची नृत्यकला सादर केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 2 तास सराव करुन रिंकू हिने आशिष याच्यासोबत व्हिडीओ शूट केला आहे.

व्हिडीओ पोस्ट करत रिंकू हिने सुरुवातीला गाण्याच्या काही ओळी कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत. ‘बस गया है कोई इस दिल में कहें या ना कहें…’ पुढे रिंकू म्हणाली, ‘माझी एक अनपेक्षित बाजू शेअर करत आहे. अगदी शेवटच्या क्षणी 2 तास सराव आणि शूटिंग करण्यासाठी आशिष पाटील तुझे खूप आभार.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रिंकू हिची चर्चा सुरु आहे.

अनेकांनी रिंकू हिच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे. एक नेटकर कमेंट करत म्हणाला, ‘मराठी मुलीची वेगळी स्टाईल… बॉलिवूडवालो मराठी मुलगी येतेय…’, दुसरा एक नेटकरी म्हणाला, ‘रिंकूला असे पाहून आनंदाश्चर्य वाटले, खूप छान.. मेहनत जाणवते.’

रिंकू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘सैराट’ सिनेमातून एका रात्रीत स्टार झाल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनेत्रीने पदार्पण केलं आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.