AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेमा मालिनी ललिता पवारला असंच मारते; ‘आशा’मधील रिंकू राजगुरूचे डायलॉग्स व्हायरल

61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवणारा 'आशा' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरूने आशा सेविकेची भूमिका साकारली असून तिच्या डायलॉग्सची सध्या जोरदार चर्चा आहे.

हेमा मालिनी ललिता पवारला असंच मारते; 'आशा'मधील रिंकू राजगुरूचे डायलॉग्स व्हायरल
Rinku Rajguru in AshaImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 21, 2025 | 9:04 AM
Share

अभिनेत्री रिंकू राजगुरूची मुख्य भूमिका असलेला ‘आशा’ हा चित्रपट 19 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाईनमुळे या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. या चित्रपटात रिंकूने आशा सेविकेची भूमिका साकारली असून महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास ‘आशा’मधून उलगडत जातो. या चित्रपटातील काही प्रभावी डायलॉग्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल चर्चेत आले आहेत. विशेषत: रिंकूचा “मी एक पिक्चर पाहिला होता, त्याच्यात हेमा मालिनी ललिता पवारला असंच मारून टाकते” हा डायलॉग प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजतोय.

“माझ्याशी जो वाकड्यात जाईल, त्याची मी खैर करणार नाही”, हा डायलॉगसुद्धा प्रेक्षकांना विशेष भावतोय. ‘आशा’ या चित्रपटाच्या दमदार ट्रेलर आणि टीझरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. गावोगावी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी पेलणं, कुटुंबातील ताणतणावांना सामोरं जाणं, अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहाणं आणि स्वतःचं ध्येय साध्य करण्याची न थकणारी धडपड, तिच्या आयुष्यातील धग, वेदना आणि तळमळ यांची झलक ट्रेलरमध्ये पहायला मिळाली होती.

रिंकू राजगुरूसह या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्याही भूमिका आहेत. सामाजिक वास्तव, महिलांवर येणारे अनेक कठोर निर्णय, भावनिक दडपण आणि अस्मितेची लढाई या सगळ्यांचा प्रभावी संगम चित्रपटात पहायला मिळतोय. ‘आशा’ ही केवळ एका सेविकेची कथा नाही, तर सर्व स्तरांवर दररोज लढणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे, हेच चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य ठरतं.

‘आशा’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान रिंकू राजगुरूच्या आईला अश्रू अनावर झाले. आपल्या लाडक्या लेकीला इतक्या मोठ्या पडद्यावर अशाप्रकारे दमदार कामगिरी करताना पाहून त्यांचे डोळे पाणावले होते. यावेळी रिंकू तिच्या आईला मिठी मारून त्यांचं सांत्वन करताना दिसली.

दिग्दर्शक दिपक पाटील या चित्रपटाविषयी म्हणाले, “‘आशा’ हा केवळ एका आरोग्य सेविकेचा प्रवास नाही. ती त्या लाखो स्त्रियांची प्रतिनिधी आहे, ज्या आयुष्यभर इतरांसाठी झिजतात, स्वतःच्या भीतींवर मात करतात आणि कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. या चित्रपटातून आम्ही त्या अनामिक योद्ध्यांना प्रकाशात आणू इच्छितो. तिचं सत्य, तिचा वेदनादायी तरीही प्रेरणादायी प्रवास आम्ही प्रामाणिकपणे मांडला आहे.”

Epstein files सार्वजनिक अन् खळबळ; एपस्टिन, मोदी भेटले! चव्हाणांचा दावा
Epstein files सार्वजनिक अन् खळबळ; एपस्टिन, मोदी भेटले! चव्हाणांचा दावा.
मुंबई कुणाची? ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला, मुंबई उपनगरात कौल कुणाला?
मुंबई कुणाची? ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला, मुंबई उपनगरात कौल कुणाला?.
246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतीचा आज निकाल, महायुती की मविआ कोणाची बाजी?
246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतीचा आज निकाल, महायुती की मविआ कोणाची बाजी?.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.