AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशा सेविका बनली रिंकू राजगुरू; नेटकरी म्हणाले ‘तू चालत रहा पुढं..’

अभिनेत्री रिंकू राजगुरूचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'आशा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रदर्शनाची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये रिंकूने आशा सेविकेची भूमिका साकारली आहे.

आशा सेविका बनली रिंकू राजगुरू; नेटकरी म्हणाले 'तू चालत रहा पुढं..'
Rinku RajguruImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 21, 2025 | 9:07 AM
Share

”बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये” अशा प्रभावी टॅगलाइनसह येणाऱ्या ‘आशा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 19 डिसेंबरला ‘आशा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने आपली ताकद सिद्ध केली आहे. 61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवत ‘आशा’ने समीक्षकांची दाद मिळवली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका साकारत आहे रिंकू राजगुरू.

रिंकू राजगुरूसोबत या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. रिंकूने साकारलेली ‘आशा’ ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक, आधार आणि निर्भय आवाज आहे. तिच्या डोळ्यांतून दिसणारा संघर्ष, तिच्या पावलांतून जाणवणारी जबाबदारी आणि संकटांचा सामना करताना न हरता उभी राहणारी ताकद आहे. या सर्वांमुळे ही भूमिका चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

या चित्रपटाविषयी दिग्दर्शक दिपक पाटील म्हणाले, ”‘आशा’ हा चित्रपट फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाहीये तर घर सांभाळून, घरासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक बाईचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आहे. सतत नवनवीन विषयांना उचलून धरणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ही वेगळ्या वाटेवरची वेगळी आणि अनोखी गोष्ट निश्चितच आवडेल, अशी खात्री आहे.’’

दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर चटवानी आणि रवींद्र अवटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट नाविन्यपूर्ण कथा घेऊन येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना कधीही न पाहिलेल्या दुनियेचं दर्शन घडवणारं आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.