जेव्हा मी मरेन तेव्हा खांदा देण्यासाठी…; सुपरस्टारने केलेली मृत्यूची भविष्यवाणी ठरली होती खरी
एका सुपरस्टारने आपल्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणी जेव्हा खरी ठरली तेव्हा अनेकांना धक्का बसला होता.

बॉलिवूडचा एक सुपरस्टार असा होता ज्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आणि निर्भय आयुष्य जगले. एक वेळ अशी आली की तो आजारी पडला आणि त्याने जगाचा निरोप घेतला. पण त्याने आपल्या मृत्यूची भविष्यवाणी ही जवळपास 5 वर्षे आधी केली होती. जेव्हा ही भविष्यवाणी खरी ठरली तेव्हा सर्वजण चकीत झाले होते. आता हा अभिनेता कोण होता? चला जाणून घेऊया…
आपल्या मृत्यूची भविष्यवाणी करणारा हा अभिनेता कोण होता? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ऋषी कपूर आहेत. ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल 2021 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यापूर्वी, जवळपास 2 वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे कळाले. त्यानंतर ते उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते. तेथून उपचार घेऊन 2020 मध्ये ऋषी कपूर भारतात परतले होते. त्यांची प्रकृती सुधारली होती. ऋषी कपूर यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला होता. पण तुम्हाला माहीत आहे का की ऋषी कपूर यांनी काही वर्षांपूर्वी भाकित केले होते की ते जास्त काळ जगणार नाहीत? त्यांनी हयात असतानाच त्यांच्या अंत्यसंस्काराचा उल्लेखही केला होता.
‘कपूर अँड सन्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी एका मुलाखतीत ऋषी कपूर यांना विचारण्यात आले की, वयाच्या 90 व्या वर्षी ते स्वत:ला कसे पाहतात. त्यावर उत्तर देत ते म्हणाले होते की, “माझी जीवनशैली पाहता, मी इतके दिवस जगू शकणार नाही.”




ऋषी कपूर यांनी एकदा ट्वीट देखील केले होते. बॉलिवूडमधील काही लोकांशी नाराज होऊन त्यांनी हे ट्वीट केले होते. 2017मध्ये जेव्हा विनोद खन्ना यांचे निधन झाले तेव्हाची ही गोष्ट आहे. अनेकजण त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आले नव्हते. तेव्हा ऋषी कपूर म्हणाले होते की, ‘हे खूप लज्जास्पद आहे. विनोद खन्ना यांच्या अंत्यदर्शनाला आजच्या पिढीतील एकही अभिनेता आला नाही. एवढेच काय, ज्यांनी त्याच्यासोबत काम केले होते तेही आले नाहीत. आदर करायला विसरु नका.’ या ट्वीटनंतर ऋषी कपूर यांनी आणखी एक ट्वीट केले होते. ‘असे का झाले… जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मी या सगळ्यासाठी तयार असेन. कोणीही मला खांदा देण्यासाठी येणार नाही. मला आजच्या स्टार्सचा खूप राग येत आहे’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले होते.