Riteish-Genelia | दुसऱ्या अभिनेत्रीच्या हातांचं चुंबन, चिडलेल्या जेनेलियाने केली रितेशची धुलाई, पाहा Video

बॉलिवूडचं क्युट कपल अर्थात अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा (Genelia D’Souza) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

Riteish-Genelia | दुसऱ्या अभिनेत्रीच्या हातांचं चुंबन, चिडलेल्या जेनेलियाने केली रितेशची धुलाई, पाहा Video
रितेश-जेनेलिया
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 10:17 AM

मुंबई : बॉलिवूडचं क्युट कपल अर्थात अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा (Genelia D’Souza) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ही जोडी सोशल मीडियावर त्यांचे धमाल व्हिडीओ शेअर करत असते. त्यांच्या या व्हिडीओंमधून त्यांची धमाल-मस्ती पाहायला मिळते. रितेश आणि जेनेलियाची ही केमेस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. नुकताच जेनेलियाने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे (Riteish Deshmukh and  Genelia D’Souza share Cute reaction video on social media).

एका पुरस्कार सोहळ्या दरम्यान एकत्र गेलेले रितेश जेनेलिया हे माध्यमांसाठी फोटो पोझ देत असतात. मात्र, तितक्यात तिथे आणखी एक अभिनेत्री येते. तिला पाहून रितेश तिच्या जवळ जातो आणि तिच्याशी गप्पा मारतो. इतकेच नाही तर तिच्या हातांची चुंबने देखील घेतो. हे पाहून जळफळाट झालेल्या जेनेलियाचे हावभाव बदलतात. हा व्हिडीओ खूप जुना असून, माध्यमांनी जेनेलियाच्या या अदा अचूक टिपल्या होत्या.

नव्या व्हिडीओत काय?

रितेश-जेनेलियाचा हा व्हिडीओ खूप जुना असला तरी, अजूनही सोशल मीडियावर तितकाच पहिला जातो. याच संधीचा फायदा घेत जेनेलियाने त्या जुन्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देणारा एक मजेशीर व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला पुरस्कार सोहळ्यातील तो चर्चित व्हिडीओ आहे. त्या व्हिडीओनंतर सध्या दुखापतग्रस्त असलेल्या जेनेलियाचा रागावलेला चेहरा समोर येतो. ज्यात ती जोरदार ठोसे लगावताना दिसते. त्यानंतर समोर सोफ्यावर रितेश घायाळ होऊन पडलेला दिसतो. तर, व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ‘तेरा नाम लिया… तुझे याद किया…’ हे गाणे वाजत आहे.

पाहा हा मजेशीर व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 (Riteish Deshmukh and  Genelia D’Souza share Cute reaction video on social media)

अर्थात रितेश आणि जेनेलियाची ही भांडण केवळ मनोरंजनाचा एक भाग होता. हा मजेशीर व्हिडीओ जेनेलियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर त्यांच्या चाहत्यांच्या कमेंट्सचा आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.

बॉलिवूडमध्येही या जोडीचं एकत्र पदार्पण

रितेश आणि जेनेलिया यांनी 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. दोघांचा हा पहिलाच सिनेमा होता. मोठ्या पडद्यावर एकत्र झळकलेली जोडी चाहत्यांना भावली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांची भेट झाली होती. आणि काहीच दिवसात ते दोघे खूप चांगले मित्र बनले आणि मग दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांचे लग्न झाले. नोव्हेंबर 2014 रोजी, जेनेलियाने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव त्यांनी दोघांनी ‘रायन’ ठेवले. या दोघांच्या दुसर्‍या मुलाचा जन्म जून 2016मध्ये झाला आणि त्याचे नाव रहाल असे ठेवले आहे.

(Riteish Deshmukh and  Genelia D’Souza share Cute reaction video on social media)

हेही वाचा :

PHOTO | ‘आपलं कुटुंब, आपला सोहळा’, पाहा रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज!

Video | आपल्या गोड आवाजाने अरुणिताने लावलंय प्रेक्षकांना वेड, ‘या’ कारणामुळे सध्या आलीय चर्चेत! पाहा व्हिडीओ…

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.