Video | रितेशसोबत नाचताना खाली पडली जेनेलिया, अभिनेत्याने शेअर केला गमतीदार व्हिडीओ!

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा (Genelia D'Souza) यांनी नुकताच त्यांच्या लग्नाच्या 9वा वाढदिवस साजरा केला.

Video | रितेशसोबत नाचताना खाली पडली जेनेलिया, अभिनेत्याने शेअर केला गमतीदार व्हिडीओ!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा (Genelia D’Souza) यांनी नुकताच त्यांच्या लग्नाच्या 9वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने ते दोघेही काही मित्रांसह घरी पार्टी करताना दिसले. जेनेलियाने या पार्टी सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये ‘धडक’ या चित्रपटाच्या ‘झिंगाट’ या गाण्यावर रितेश आणि जेनेलिया दोघेही एकत्र नाचताना दिसत आहेत. दरम्यान, असे काहीतरी घडले की ज्यामुळे प्रत्येकजण आपले हसणे थांबवू शकला नाही. (Riteish Deshmukh and Genelia D’Souza’s dance video goes viral on social media)

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

नाचत असताना जेनेलिया उत्साहात आधी स्टेप करते त्यामुळे तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. त्यांच्याबरोबर तिथे नाचत असलेला अभिनेता आशिष चौधरीलाही जेनेलियाचा धक्का लागतो आणि तो खाणी पडतो. मात्र, त्यानंतरही रितेश देशमुख नाचतच राहिला आणि ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यावर कॅमेराकडे पाहून हसताना त्याच्या चेहऱ्यावर हे स्पष्ट दिसत आहे की तोसुद्धा आपले हसणे रोखू शकला नव्हता.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत हे 10 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडिओ बघितला गेला आहे. कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी या व्हिडीओचे कौतुक देखील केले आहे. या व्हिडीओवर सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. फिल्म कोरिओग्राफर फराह खानने देखील कमेंट बॉक्समध्ये फणी कमेंट केली आहे. रितेश आणि जेनेलियाचे लग्न…

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांची भेट झाली होती. आणि काहीच दिवसात ते दोघे खूप चांगले मित्र बनले आणि मग दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. 3 फेब्रुवारी 2012 रोजी दोघांचे लग्न झाले. नोव्हेंबर 2014 रोजी, जेनेलियाने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव त्यांनी दोघांनी ‘रायन’ ठेवले. या दोघांच्या दुसर्‍या मुलाचा जन्म जून 2016मध्ये झाला आणि त्याचे नाव रहाल असे ठेवले आहे.

संबंधित बातम्या : 

कुणाच्याही वाट्याला असे दिवस येऊ नयेत, लग्न झाल्यानंतर या 5 अभिनेत्रींनी नरक यातना सोसल्या…!

Takht | करण जोहरचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट रद्द, वाचा नेमकं काय घडलं!

Pathan | पठाण चित्रपट बॉलिवूडची शान बनणार? शाहरुखने आखला मोठा प्लॅन!

(Riteish Deshmukh and Genelia D’Souza’s dance video goes viral on social media)

Published On - 6:55 pm, Tue, 2 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI