AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; ‘राजा शिवाजी’च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती

Raja Shivaji : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. मात्र अशातच रितेशने चाहत्यांना एक कळकळीची विनंती केली आहे. यासाठी त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Raja Shivaji : मला तुमच्या भावना समजतात, पण..; 'राजा शिवाजी'च्या प्रेक्षकांना रितेश देशमुखची विनंती
रितेश देशमुखImage Credit source: Instagram
| Updated on: May 03, 2026 | 11:03 AM
Share

अभिनेता रितेश देशमुखचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. रितेशनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिकासुद्धा साकारली आहे. एकीकडे सोशल मीडियावर आणि थिएटरमध्ये या चित्रपटासाठी क्रेझ पहायला मिळत असून, दुसरीकडे रितेशने अतिउत्साही चाहत्यांना एक विनंती केली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत त्याने चाहत्यांना ही गोष्ट टाळण्याची विनंती केली आहे.

काय म्हणाला रितेश?

“आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आम्ही चित्रपट काढला. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट तुम्ही स्वत:चा समजून थिएटरमध्ये तो पहायला गेलात. या चित्रपटाला मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल मी आणि चित्रपटाची संपूर्ण टीम तुमचे आभार मानतो. फक्त एक विनंती आहे, मला तुमच्या भावना समजत आहेत की तुम्ही उत्सुकतेपोटी थिएटरमध्ये व्हिडीओ काढत आहात, तुम्ही बाहेर पोस्ट करत आहात. पण व्हिडीओ पोस्ट करू नका अशी विनंती तुम्हाला करतो. फोटो पोस्ट करा, माझी काहीच हरकत नाही. कारण इतर जे प्रेक्षक थिएटरमध्ये चित्रपट बघायला येणार आहेत, त्यांना पण काही सरप्राइज मिळू द्या, त्यांनाही चित्रपटाचा आनंद घेऊ द्या. तुमचा प्रतिसाद असाच असू द्या, जय शिवराय,” अशी विनंती त्याने चाहत्यांना केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

अनेकजण थिएटरमध्ये चित्रपटातील काही सीन्सचे व्हिडीओ शूट करून ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. यामुळे त्यातील सरप्राइज इतरांना कळून जातात आणि चित्रपटाविषयी फारशी उत्सुकता राहत नाही. ‘राजा शिवाजी’मधील सलमानच्या एण्ट्रीचा सीन सोशल मीडियावर अशाच पद्धतीने व्हायरल झाला होता. त्यानंतर तो काढून टाकण्यात आला होता. परंत तोवर त्याचे स्क्रीनशॉट्स सर्वत्र व्हायरल झाले होते. अशा घटना टाळण्यासाठी रितेशने चाहत्यांना ही विनंती केली आहे.

‘राजा शिवाजी’ने शनिवारी 10.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर पहिल्याच दिवशी 11.35 कोटी रुपयांची कमाई झाली होती. त्यामुळे दोन्ही दिवसांच्या कमाईचा आकडा हा 21.90 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. राजा शिवाजी या चित्रपटासोबतच बॉक्स ऑफिसवर आमिर खानचा मुलगा जुनैद याचा ‘एक दिन’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र रितेशच्या चित्रपटावर या बॉक्स ऑफिस टक्करचा फारसा परिणाम झाला नाही.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग