AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रुस्तम’, ‘पॅडमॅन’ची निर्माती प्रेरणा अरोराला सहा महिन्यांचा कारावास

पैसे देण्याचे खोटे आश्वासन देऊन कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाने निर्माती प्रेरणा अरोराला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे

'रुस्तम', 'पॅडमॅन'ची निर्माती प्रेरणा अरोराला सहा महिन्यांचा कारावास
| Updated on: Mar 02, 2020 | 12:50 PM
Share

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा हिला मुंबई उच्च न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास ठोठावला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत प्रेरणाला गजाआड करण्यात येणार आहे. कारावासात पाठवण्यासाठी आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये आज (सोमवार 2 मार्च) आत्मसमर्पण करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. प्रेरणा अरोराने ‘रुस्तम’, ‘पॅडमॅन, ‘टॉयलेट – एक प्रेमकथा’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. (Producer Prernaa Arora gets jail)

‘गॉथिक एंटरटेनमेंट’ कंपनीने ‘क्रिअर्स एंटरटेनमेंट’च्या प्रमुख प्रेरणा अरोरा-प्रोतिमा अरोरा यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर कोर्टाने कारवाई सुरु केली होती. कोर्टासमोर झालेल्या तडजोडीनुसार ‘क्रिअर्स एंटरटेनमेंट’ प्रॉडक्शन हाऊसच्या वतीने ‘गॉथिक एंटरटेनमेंट’ला 25 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं ठरलं होतं. मात्र ‘क्रिअर्स एंटरटेनमेंट’ अडीच कोटींचे दोन हप्ते भरण्यातही अपयशी ठरलं. चेक बाऊन्स झाल्यामुळे ‘गॉथिक’ने उच्च न्यायालयात धाव घेतली.

पुण्यात अभिनेत्रीला सोन्याची अंगठी चोरताना अटक

प्रेरणाने अरोराने हप्ते भरले नसल्याची माहिती ‘गॉथिक एंटरटेनमेंट’ने 5 फेब्रुवारीला कोर्टाला दिली. यानंतर कोर्टाने प्रेरणा अरोराला नोटीस बजावली. तुमच्याविरुद्ध कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा का नोंदवला जाऊ नये, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. परंतु प्रेरणाने या नोटीशीला उत्तर देण्याची तसदीही घेतली नाही. त्यामुळे पैसे देण्याचे खोटे आश्वासन देऊन कोर्ट आणि ‘गॉथिक एंटरटेनमेंट’ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा ठपका प्रेरणावर ठेवण्यात आला आहे.

प्रेरणा अरोरा याआधीही आठ महिन्यांचा तुरुंगवास भोगून आली आहे. तिच्यावर अनेक फायनान्सर्सनी फसवणूक केल्याचा आणि पैसे परत न दिल्याचा आरोप केला होता. जेव्हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते वासू भगनानी यांनी प्रेरणाला नोटीस पाठवली, तेव्हा तिच्या अडचणीत अधिक वाढ झाली. भगनानी यांनी प्रेरणाला तातडीने 31.6 कोटी परत करण्यास सांगितलं होतं.

न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांनी 24 फेब्रुवारी रोजी प्रेरणाविरोधात कोर्टाच्या अवमानतेचा आदेश जारी केला होता. प्रेरणाच्या अपीलानंतर तिला मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र आत्मसमर्पण करण्यात ती अपयशी ठरली, तर कोर्ट अजामीनपात्र अटक वॉरंट काढेल, असा आदेश न्यायालयाने शनिवारी कोर्टाच्या वेबसाइटद्वारे जारी केला. (Producer Prernaa Arora gets jail)

इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला
ठाकरेंमुळे उन्हाळ्यातही वातावरण तापत नाही, तर थंडीत.. गायकवाडांचा टोला.
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर
राज ठाकरे यांना गुन्हा मान्य आहे का? कोर्टाच्या सवालावर थेट उत्तर.
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं
विधानसभेत बळीराजाच्या दुर्दशेवरून भास्कर जाधव यांनी सरकारला घेरलं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं....
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?
अदानी, राहुल गांधी पहिल्यांदाच एकसाथ? पवारांच्या निवासस्थानी काय घडलं?.
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?
कसली कॉलर टाईट अन् कसलं महापौरपद... भाजप नेत्यांवर समोय्यांची नाराजी?.
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?
मुख्यमंत्र्यांची महायुतीच्या आमदारांसह ब्रेकफास्ट मिटिंग, कशावर चर्चा?.
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?
राज ठाकरे यांची ठाणे न्यायालयात आज सुनावणी, 2008 चं प्रकरण नेमकं काय?.