AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झहीर खानशी लग्नानंतर अभिनयापासून दूर गेली सागरिका; म्हणाली “नात्यांसाठी..”

'चक दे इंडिया'मध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री सागरिका घाटगे ही क्रिकेटर झहीर खानशी लग्न केल्यानंतर अभिनयापासून दूर गेली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सागरिका याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

झहीर खानशी लग्नानंतर अभिनयापासून दूर गेली सागरिका; म्हणाली नात्यांसाठी..
सागरिका घाटगे, झहीर खानImage Credit source: Instagram
| Updated on: May 06, 2024 | 1:23 PM
Share

‘चक दे इंडिया’ या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. यामध्ये प्रिती सबरवालची भूमिका साकारणारी अभिनेत्री सागरिका घाटगे विशेष प्रकाशझोतात आली होती. सागरिकाचा हा बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट होता. या पहिल्यावहिल्या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने मराठी चित्रपटातही काम केलं. करिअरच्या शिखरावर असताना सागरिकाने 2017 मध्ये भारतीय क्रिकेटर झहीर खानशी लग्न केलं. झहीर खान आणि सागरिकाची जोडी सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. लग्नानंतर सागरिका चित्रपटांपासून दूर गेली. मात्र ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सागरिका तिच्या कमबॅकविषयी आणि इतरही काही मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली. लग्नानंतर झहीर खानची पत्नी अशी ओळख निर्माण झाल्याविषयीही तिने प्रतिक्रियी दिली आहे.

लग्नानंतर सागरिका घाटगे म्हणून कमी आणि झहीरची पत्नी म्हणून अधिक ओळखलं जात असल्याबद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “लोक मला झहीर खानची पत्नी म्हणून ओळखतात, याचा मला अभिमान आहे. मी माझ्या आयुष्यातील लहान-सहान गोष्टींनाही खूप महत्त्व देते. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो, असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असता किंवा लग्न करता, तेव्हा त्या नात्याला तुम्ही प्राधान्य देता. मी झहीर खानची पत्नी असल्याचा मला खूप अभिमान आहे आणि लोक मला तसं ओळखत असतील तर मला आनंदच आहे.”

अभिनेता अंगद बेदीच्या एका पार्टीत झहीर आणि सागरिकाची एकमेकांशी पहिल्यांदा भेट झाली होती. “आमच्या स्वभावात खूप साम्य आहे. त्यामुळे लग्नाच्या वेळी फारशा समस्या आल्या नव्हत्या. दोघांच्या कुटुंबीयांनीही साथ दिली होती. क्रिकेट असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो, झहीरच्या विचारांमध्ये खूप स्पष्टता असते. त्यामुळे आम्ही दोघांनी हे नातं पुढे नेण्याचा विचार केला होता,” असंही सागरिकाने सांगितलं.

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील घाटगे घराण्यात सागरिकाचा जन्म झाला. लहाणपणापासून तिला कलेची आवड होती. तिने ‘चक दे इंडिया’, ‘फोक्स’, ‘मिले ना मिले हम’ यांसारख्या हिंदी तर ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटात काम केलंय. ‘चक दे ​​इंडिया’मध्ये हॉकीपटूची भूमिका साकारणारी सागरिका ही राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आहे. ती ‘फिअर फॅक्टर’, ‘खतरों के खिलाडी’मध्ये देखील दिसली होती.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत