Marathi Movie : ‘…आणि पावसाळा होणार ‘कलरफुल’, सई- ललितच्या ‘कलरफुल’ चित्रपटाची तारीख रिलीज

येत्या 2 जुलैला प्रेमाच्या पावसानं चिंब भिजवायला 'कलरफुल’ हा सिनेमा येतोय. (Sai Tamhankar and Lalit Prabhakar's 'Colorful' movie's release date is here)

  • Updated On - 12:07 pm, Tue, 9 February 21
Marathi Movie :  ‘...आणि पावसाळा होणार 'कलरफुल’, सई- ललितच्या 'कलरफुल' चित्रपटाची तारीख रिलीज

मुंबई : कोरोनामुळे 2020 या वर्षात लॉकडाऊन झाला आणि सगळ ठप्प झालं. चित्रपटांचं शुटिंग थांबलं, चित्रपटगृह बंद करण्यात आली. परिणामी रसिकांना चित्रपटगृहांपासून लांब राहावं लागलं. काही महिने चित्रपटगृहांचा अनुभव न घेतलेल्या प्रेक्षकांना 2020 वर्षानं जाता जाता अनलॉकचं गिफ्ट दिलं. कोरोनाचा बसलेला हा विळखा जसा कमी व्हायला लागला तसं तशी मनोरंजनसृष्टी पुन्हा एकदा जोमानं सुरू झाली आणि आता नवनवीन मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा, घोषणांचा सीलसिला सुरू झाला.

काही दिवसांपूर्वीच मराठीतल्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘कलरफुल’ सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची मुख्य भूमिका असणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय सुंदर आणि रंगीन नाव असणारा हा सिनेमा घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतंच या सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज झालं आणि सोबतच प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली. येत्या 2 जुलैला प्रेमाच्या पावसानं चिंब भिजवायला हा सिनेमा येतोय. हे नवीन पोस्टर या प्रेमाच्या महिन्यात अतिशय सुखद अनुभव देणाऱ्या प्रेमाचे नवीन रंग उधळणारे आहे. अतिशय सुंदर, रोमँटिक धुक्यात हरवलेल्या ठिकाणी पायऱ्यांवर बसलेली सई आणि ललितची जोडी अतिशय मोहक दिसत आहे. प्रेमानं ओतप्रोत असलेले त्यांचे डोळे आणि दोघांच्या कानावर लावलेलं फुल हे या पोस्टरवर लक्षवेधी ठरत आहे. जसजसे या सिनेमाचे पोस्टर समोर येत आहे, तस तशी चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्कंठा वाढत आहे.

Colourful

प्रकाश कुंटे दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती मानसी आणि मुन्ना शकुल यांनी केली आहे. मानसी या मुख्यत: हिंदी चित्रपटांमध्ये कार्यरत असून हा सिनेमा मानसी यांच्या यंत्रा पिक्चर्स आणि मुन्ना शकुल यांच्या शकुल शोबिझ या दोन्ही बॅनरच्या सहयोगानं सादर होणार आहे. यानिमित्तानं यंत्रा पिक्चर्स बँनरच्या मानसी सांगतात, ” मला यंत्रा पिक्चर्स आणि शकुल शोबिझ यांच्या एकत्रीकरणामुळे खूप आनंद होत आहे. आता आम्ही मिळून लवकरच हिंदी, मराठी आणि गुजराती सिनेमे प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. आमची मराठी चित्रपटांची सुरुवात ‘कलरफुल’ सिनेमानं होत असल्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. यंत्रा पिक्चर्स, शकुल शोबिझ निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानानं 2 जुलैला प्रदर्शित होणारा हा चित्रपट नक्कीच सर्वांना प्रेमाचा एक वेगळा रंग दाखवेल यात शंका नाही.” यावर्षी यंत्रा पिक्चर्स आणि शकुल शोबिझ मराठीसह गुजराती चित्रपट आणि वेबसिरीज सुद्धा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.

संबंधित बातम्या 

Marathi Serial : असे साकारले जातात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतील अ‍ॅक्शन सीक्वेन्स

Video | कोच रिकामा, मग मराठी अभिनेत्रीचं छय्यां छय्यां, पहा व्हिडीओ !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI