Marathi Serial : असे साकारले जातात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतील अ‍ॅक्शन सीक्वेन्स

स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. (Marathi Serial Dakkhancha Raja Jyotiba )

Marathi Serial : असे साकारले जातात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेतील अ‍ॅक्शन सीक्वेन्स
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 7:16 PM

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. असुरांचा संहार करण्यासाठी ज्योतिबाने अवतारी रुप धारण केलं आहे. हा संहार करताना दाखवले जाणारे युद्धाचे प्रसंग कसे शूट केले जातात याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. हे युद्धाचे प्रसंग शूट करणं हे संपूर्ण टीमसाठी मोठं आव्हान असतं. ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमसोबतच दिग्दर्शक शैलेश ढेरे आणि नितीन काटकर, सेटवरची तंत्रज्ञ मंडळी, या सीनला भव्यदिव्य रुप देणारे 4 K व्हिज्युअल्स ग्राफिक्स टीम आणि फाईट मास्टर सुरज ढोली यांची प्रचंड मेहनत आहे. पडद्यावर अवघे काही मिनिटं दिसणाऱ्या या सीक्वेन्सची तयारी दोन दिवस आधीपासून सुरु असते. 

मालिकेतल्या या अ‍ॅक्शन सीक्वेन्सविषयी सांगताना ज्योतिबा म्हणजेच विशाल निकम म्हणाले, ‘आमच्या संपूर्ण टीमसाठी ही मालिका साकारणं म्हणजे एक आव्हान आहे. मालिकेच्या पुढील भागांमध्ये असुर रुधोचन आणि ज्योतिबामध्ये युद्ध होणार आहे. या सीक्वेन्सची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. फाईट मास्टर सुरज ढोली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सीन करत आहोत. लाठीकाठी, तलवारबाजी, भाला, दांडपट्टा असे शिवकालीन मर्दानी खेळ दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या पारंपरिक खेळांची कला मला अवगत असल्यामुळे त्याचा सीन करताना खूप फायदा होतो. युद्धाचा हा भव्यदिव्य प्रसंग प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. 

फिट राहण्यासाठी आणि उत्तम लाईफस्टाईलसाठी तुमचे लाडके कलाकार जीम, वर्कआऊट, योगा आणि डान्स यासारख्या अनेक गोष्टी करत असतात. यात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत ज्योतिबा साकारणारा विशाल निकमही मागे नाहीये. ज्योतिबांची भूमिका साकारण्यासाठी विशाल भरपूर मेहनत घेतोय. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढत विशाल वर्कआऊट करतो. खरंतर शूटिंगमधून जीमसाठी वेगळा वेळ काढणं शक्य होत नाही त्यामुळे विशालनं चक्क सेटवरच वर्कआऊट करणं सुरू केलं आहे.

भूमिकेसाठी शरीर फिट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे विशालनं हा नवा मार्ग शोधून काढला आहे. सेटवरच्या वस्तूंचा वापर करत त्यानं सेटलाच जीम बनवलं आहे. विशाल शुद्ध शाकाहरी व्यक्ती आहे. त्यामुळे दूध, मोड आलेली कडधान्य, ताज्या भाज्या आणि फळं अश्या सकस आहाराकडे नेहमीच त्याचा कल असतो. सोबत दररोजचा व्यायाम केल्यामुळे विशालला शरीर फिट ठेवणं शक्य झालं आहे.

संबंधित बातम्या 

चित्रपटाच्या सेटवर वरुण धवनला येतेय पत्नी नताशाची आठवण!

कपिल शर्मा शो बंद होताच स्टार प्लसचा ‘कॉमेडी अड्डा’, रणवीर सिंह सारख्या अनेक दिग्गजांची मांदियाळी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.