Saif Ali Khan: बायको, मुलं, कुटुंब नाही तर, शुद्धीवर येताच सैफने डॉक्टरांना विचारले ‘हे’ 2 प्रश्न
Saif Ali Khan: सैफ अली खान याच्यासाठी 'या' 2 गोष्टी अधिक जवळच्या, शुद्धीवर येताच बायको, मुलं, कुटुंब नाही तर अभिनेत्याने डॉक्टरांना विचारले दोन प्रश्न, प्राणघातक हल्ला झाल्यानंतर सैफ अली खान प्रकृती स्थिर...

Saif Ali Khan: गुरुवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाल्यानंतर अभिनेता सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर आहे. अभिनेता शुद्धीवर आल्याची माहिती देखील समोर येत आहे. आता अभिनेत्याला आयसीयू मधून नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सैफच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान, शुद्धीवर आल्यानंतर सैफने डॉक्टरांना दोन प्रश्न विचारले असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
सांगायचं झालं तर, शुद्धीवर आल्यानंतर सैफने बायको, मुलं आणि कुटुंबियांबद्दल काहीही विचारलं नाही. तर अभिनेत्याने स्वतःला अधिक प्रिय असलेल्या गोष्टींबद्दल डॉक्टरांना विचारलं असल्याची माहिती मिळत आहे. शुद्धीवर येताच सैफने डॉक्टरांना पहिला प्रश्न विचारला.
सैफचा पहिला प्रश्न होता, तो शुटिंग करु शकतो का? अभिनेत्याचा दुसरा प्रश्न होता, ‘तो जीम करू शकतो का?’ यावर डॉक्टरांनी देखील अभिनेत्याला आश्वासन दिलं आहे. दोन आठवड्यांनंतर सैफ अली खान शुटिंग आणि जीम करू शकतो. पण सध्या अभिनेत्याला आरामाची गरज आहे… असं देखील डॉक्टर म्हणाले आहेत.
सैफ अली खान याच्या प्रकृतीबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या 24 तासांपासून अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे. हल्ल्यानंतर सैफ स्वतः रक्तबंबाळ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. यावेळी अभिनेत्याचा मोठा मुलगा तैमूरही त्याच्यासोबत होता.
सांगायचं झालं तर, गुरुवारी रात्री 2 वाजता एका अज्ञात व्यक्तीने सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला केली. हल्ल्यात सैफला मान आणि मणक्यासह सहा ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. सर्वात गंभीर दुखापत त्याच्या पाठीच्या कण्याला झाली होती, जिथे चाकूचा 2.5 इंच तुकडा अडकला होता. डॉक्टरांनी सहा तासांची शस्त्रक्रिया करून चाकूचा तुकडा यशस्वीपणे काढला. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे.
कशी आहे सैफ अली खानची प्रकृती?
सैफ अली खान सध्या त्याच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आहे. गुरुवारी मध्यरात्री हल्ला झाल्यानंतर अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. तरी डॉक्टरांनी सैफला दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजताच सैफच्या चाहत्यांनी देखील मोकळा श्वास घेतला आहे.