AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफ अली खान हल्ला प्रकरणात टर्निंग पॉइंट; CCTV मध्ये दिसणारा अन् अटकेतील आरोपी वेगळे, काय म्हणतायत फॉरेन्सिक तज्ज्ञ?

अभिनेता सैफ अली खानला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आरोपी आणि अटकेत असलेला आरोपी यांच्या दिसण्यात बराच फरक असल्याचं म्हटलं गेलंय.

सैफ अली खान हल्ला प्रकरणात टर्निंग पॉइंट; CCTV मध्ये दिसणारा अन् अटकेतील आरोपी वेगळे, काय म्हणतायत फॉरेन्सिक तज्ज्ञ?
सैफ अली खानImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 23, 2025 | 9:48 AM
Share

अभिनेता सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी सातत्याने नवनवीन अपडेट्स येत आहेत. पाच दिवसांच्या उपचारानंतर सैफला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तर दुसरीकडे पोलिसांकडून याप्रकरणाची कसून चौकशी होत आहे. अशातच आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचे वकील नागेश मिश्रा यांनी दावा केला की, सीसीटीव्ही फुजेटमध्ये दिसणारा आरोपी आणि अटक करण्यातथ आलेला आरोपी यांच्या दिसण्यात बरीच तफावत आहे. प्रथमदर्शनी हे स्पष्ट पहायला मिळतंय की 16 जानेवारीच्या सीसीटीव्हीमधील हल्लेखोर आणि पोलिसांनी पकडलेला आरोपी या दोघांच्या चेहऱ्यात बराच फरक आहे. मात्र आरोपीने स्वत:हून गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांच्या चौकशीला आव्हान देऊ शकत नाही, असं वकिलांनी म्हटलंय. त्याचसोबत कोर्टात पोलिसांसमोर दिलेल्या कबुलीला फारसं महत्त्व नसतं, बाकी अशा खटल्यात कोरेब्रिटी एविडन्स द्यावे लागतात, अशी माहिती वकिलांनी दिली.

सैफ अली खानच्या या खटल्यात आता त्याच्या घरातील सदस्यांचे, नोकर-चाकरांचे जबाब नोंदवले जातील. यादरम्यान कारागृहातील आयडी परेडमध्ये आरोपीला ओळखावं लागतं. त्याच्याच उंचीच्या आणि शरीरयष्टीच्या अनेक लोकांना उभं केलं जातं आणि कुटुंबातील सदस्य किंवा प्रत्यक्षदर्शींच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली जाते. फॉरेन्सिक एक्सपर्ट रजनी पंडित यांच्या मते, जोपर्यंत समोरासमोर दोघांना पाहत नाही, तोपर्यंत दोघं एकच आहेत असं म्हणता येणार नाही. फोटोंमध्ये प्रकाश, अँगल यांमुळे खूप फरक पडतो. हेअरकटमुळेही चेहरा बदलतो. मुख्यत: ज्यांनी आरोपीला पाहिलंय, त्यांनी त्याची ओळख पटवली, तर ते महत्त्वाचं ठरेल, असं त्या म्हणाल्या.

मुंबई फॉरेन्सिक सायन्स विभागाच्या संचालिका रुक्मिणी कृष्णमूर्ती म्हणाल्या, “फॉरेन्सिक वैज्ञानिक असल्याने आम्ही अशा निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही. मला वेगळं वाटलं तरी मी तसं बोलणार नाही. त्यासाठी योग्य विश्लेषण केलं जातं. ज्यामध्ये अनेक पैलू तपासून पाहिले जातात. केशरचना, कपाळ, डोळे, नाक, हनुवटी या प्रत्येक गोष्टीची डिजिटल तुलना केली जाते. यासाठी सॉफ्टवेअर वापरले जातात आणि केवळ तज्ज्ञच हे विश्लेषण करू शकतात. केवळ बघून मी काही सांगू शकणार नाही.”

फाटकी नोट नाकरली अन् राग डोक्यात, पंपावर काढली थेट तलवार अन्...
फाटकी नोट नाकरली अन् राग डोक्यात, पंपावर काढली थेट तलवार अन्....
दिल्ली स्फोटातील i-20 चा शेवटचा मालक सापडला, पुलवामाशी काय कनेक्शन?
दिल्ली स्फोटातील i-20 चा शेवटचा मालक सापडला, पुलवामाशी काय कनेक्शन?.
माहिमच्या खाडीत ट्रान्सजेंडरची उडी, बचावासाठी तरुणाचीही डेरिंग अन्...
माहिमच्या खाडीत ट्रान्सजेंडरची उडी, बचावासाठी तरुणाचीही डेरिंग अन्....
तो स्फोट पाकनं घडवला, असीम मुनीरनं घेतला भारताचा बदला? -निवृत्त कर्नल
तो स्फोट पाकनं घडवला, असीम मुनीरनं घेतला भारताचा बदला? -निवृत्त कर्नल.
'व्हाईट कॉलर' मॉड्यूलचा अल-फलाह युनिव्हर्सिटीचा संबंध काय? कुठे छापे?
'व्हाईट कॉलर' मॉड्यूलचा अल-फलाह युनिव्हर्सिटीचा संबंध काय? कुठे छापे?.
बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार? बघा काय सांगताय एक्झिट पोलचे आकडे?
बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार? बघा काय सांगताय एक्झिट पोलचे आकडे?.
10 तास प्रवास, 7 वाजता स्फोट, दिल्ली स्फोटातील ती कार कुठं कुठं फिरली?
10 तास प्रवास, 7 वाजता स्फोट, दिल्ली स्फोटातील ती कार कुठं कुठं फिरली?.
आई पहिलं प्रेम बाप ताकद, कुटुंबासोबत जेवणाचा प्लॅन पण..स्फोटात मृत्यू!
आई पहिलं प्रेम बाप ताकद, कुटुंबासोबत जेवणाचा प्लॅन पण..स्फोटात मृत्यू!.
स्फोटातील कारचा नवा Video, PUC चेक करताना i-20 मध्ये बसलेले तिघं कोण?
स्फोटातील कारचा नवा Video, PUC चेक करताना i-20 मध्ये बसलेले तिघं कोण?.
तुमचं अपयश लपवण्यासाठी कोणत्याही..आझमी नेमकं काय म्हणाले? कुणाकडे रोख?
तुमचं अपयश लपवण्यासाठी कोणत्याही..आझमी नेमकं काय म्हणाले? कुणाकडे रोख?.