Saif Ali Khan : सैफची प्रकृती आता कशी ? आयसीयूबाहेर आला का? डॉक्टरांनी दिले अपडेट्स
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी चाकूने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सैफ अली खानचे हेल्थ अपडेट प्रसिद्ध झाले आहे. सैफची प्रकृती आता कशी ? आयसीयूबाहेर आला का ? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणाले?

प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसलेल्या चोराने त्याच्यावर हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी झालेल्या सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली. आता सैपच्या पर्कृतीबद्दल हेल्थ अपडेट जारी करण्यात आले आहे. सैफवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. सैफला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले असून त्याला आता एका स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. डॉक्टरांन त्याचे हेल्थ बुलेटिन जारी केले आहे.
काय म्हणाले डॉक्टर ?
सैफ अली खान यांची प्रकृती आता उत्तम आहे. काल पहाटे आम्ही सैफ यांचं ऑपरेशन केलं होतं, त्यांना ऑपरेशननंतर आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज त्यांची तब्येत चांगली आहे, असे चीफ न्यूरोसर्जन नितीन डांगे यांनी सांगितलं. त्यांना आम्ही आज चालवलं,चालताना काहीही प्रॉब्लेम आला नाही. फक्त त्यांच्या पाठीमध्ये खोल जखम झालेली असल्याने इन्फेक्शनचे चान्सेस आहेत. त्यांच्या पाठीतून पाणी येत होतं, तिथे सर्जरी केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितली आहे, म्हणून आम्ही त्यांना आज आयसीयूमधून स्पेशल रूममध्ये शिफ्ट करत आहोत असं डॉक्टरांनी नमूद केलं. ते आऊट ऑफ डेंजर आहेत, स्टेबल आहेत. त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा होत आहे, असे डॉ. डांगे यांनी सांगितलं.
अवघ्या 2 मिमीने वाचला मणका
हल्लेखोरानो सैपच्या पाठीवरही चाकूने हल्ला केला होता, त्याच्या पाठीच्या मणक्याजवळही दुखापत झाली होती, अशी माहिती समोर आली होती. याबद्दलही डॉक्टरांनी स्पष्ट माहिती ली. अवघ्या 2 मिमीने सैफ यांचा मणका वाचला. तो चाकू थोडा आणखी खोल गेला असता तर त्यांच्या स्पायनल कॉर्डमध्ये दुखापत झाली असती. मात्र आता तसे काहीही नाही, ते आज व्यवस्थित चालले, बोलले, त्यांना पॅरालिसिस होण्याचाही कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
हल्ला झाल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा स्वत:च्या पायांवर चालत होता, त्याने एखाद्या हिरोप्रमाणेच संपूर्ण प्रसंगाचा सामना केला. आता त्याची प्रकृती उत्तम असून लवकरच रिकव्हरी होईल. मात्र त्याला 1 आठवडा हालचाल करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याला इन्फेक्शन होण्याचा धोका अजूनही असल्याने हॉस्पिटलमध्ये भेटायला येणाऱ्यांपासून जपून राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
सैफच्या शरीरावर किती जखमा होत्या?
खरंतर सैफ अली खानच्या शरीरावर 6 ठिकाणी चाकूने वार करण्यात आले होते. त्याच्या 6 जखमांपैकी 2 खूप खोल होत्या. पण तो आता पूर्णपणे बरा आहे. चाकूचा 2.5 इंच तुकडा अभिनेत्याच्या पाठीत गेला होता. मात्र, हा चाकू 2 मिमीने खोल गेला असता, तर अर्धांगवायू होऊ शकला असता. तसेच त्यांच्या शरीरावर चार छोट्या जखमा होत्या, त्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागली. आता सैफ अली खान पूर्णपणे बरा आहे असं डॉक्टरांनी नमूद केलं.