AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मुलांसाठी खूप वाईट..”; अमृता सिंगसोबतच्या घटस्फोटाविषयी सैफ अली खान व्यक्त

सैफ आणि अमृता यांच्या वयात तब्बल 12 वर्षांचं अंतर होतं. मात्र त्याचाही दोघांना काही फरक पडला नाही. या दोघांनी गुपचूप लग्न केलं आणि लग्नाच्या 13 वर्षांनंतर सैफ आणि अमृता विभक्त झाले. त्यावेळी सैफ आणि अमृताचा मुलगा इब्राहिम हा फक्त तीन वर्षांचा होता.

मुलांसाठी खूप वाईट..; अमृता सिंगसोबतच्या घटस्फोटाविषयी सैफ अली खान व्यक्त
पूर्व पत्नी अमृता सिंगबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला सैफ अली खानImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 28, 2023 | 3:01 PM
Share

मुंबई : 28 डिसेंबर 2023 | अभिनेता सैफ अली खान त्याच्या पहिल्या पत्नीसोबतच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. सैफने आई शर्मिला टागोरसोबत ‘कॉफी विथ करण 8’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तो पूर्व पत्नी अमृता सिंगबद्दल व्यक्त झाला. वयाच्या 21 व्या वर्षी लग्न करणं ही गोष्ट खूप वेगळी होती, असंही सैफ म्हणाला. सैफ आणि अमृताच्या घटस्फोटाच्या वेळी संपूर्ण कुटुंब वाईट काळाचा सामना करत होता, असा खुलासाही शर्मिला यांनी केला. कारण त्यावेळी सैफ आणि अमृताचा मुलगा इब्राहिम हा फक्त तीन वर्षांचा होता. आजोबा टायगर यांच्यासोबत त्याची खूप जवळीक निर्माण झाली होती. मात्र तेव्हाच घटस्फोट झाल्याने मुलांसाठी आणि कुटुंबीयांसाठी त्यातून सावरणं खूप कठीण गेल्याचं त्या म्हणाल्या.

घटस्फोटाबद्दल काय म्हणाला सैफ अली खान?

“दुर्दैवाने, वयाच्या विसाव्या वर्षी हे सर्व झालं. त्यानंतर गोष्टी बदलल्या. पण तिने माझी खूप साथ दिली. ती माझ्या दोन मुलांची आई आहे. तिच्यासोबत आता माझं नातं चांगलं आहे आणि दोघंही एकमेकांना आदर करतो. दोन लोकांमध्ये जेव्हा काही गोष्टी जुळून येत नाहीत, तेव्हा मुलांसाठी खूप वाईट वाटतं. कारण त्यांनी असं काही अनुभवावं ही तुमची इच्छा कधीच नसते”, असं सैफ म्हणाला.

अमृता आणि सैफच्या वयातील अंतरामुळे आई शर्मिला टागोर यांचा लग्नाला साफ नकार होता. मात्र आईच्या नकळतच सैफने अमृताशी लग्न केलं होतं. लग्नाच्या एक दिवसानंतर त्याने आईला त्याविषयी सांगितलं होतं. तेव्हा शर्मिला यांच्या डोळ्यात अश्रू होते. “तू माझं मन दुखावलंस”, असं त्या सैफला म्हणाल्या होत्या. जेव्हा अमृताशी घटस्फोट घेण्याचा निर्णय सैफने घेतला, तेव्हा सर्वांत आधी त्याने आईलाच फोन करून त्याबद्दलची माहिती दिली होती.

सैफशी घटस्फोट झाल्यानंतर अमृतानेच सारा आणि इब्राहिमला लहानाचं मोठं केलं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. 1991 मध्ये अमृताने सैफशी लग्न केलं आणि सर्वांसाठी हा खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता. त्यावेळी सैफकडे ‘कॅसानोव्हा’ म्हणून पाहिलं जायचं. अमृताच्या आधीही सैफच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या. मात्र अमृताशी भेट झाल्यानंतर त्याने थेट लग्न करायचं ठरवलं होतं. या दोघांच्या वयात तब्बल 12 वर्षांचं अंतर होतं.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.