AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saiyaara : ‘सैयारा’ जोडीचा रिअल-लाइफ रोमान्स; अहान पांडे खऱ्या आयुष्यात पडला हिरोइनच्या प्रेमात

Saiyaara : 'सैयारा' या चित्रपटातील फ्रेश जोडीने चाहत्यांची मनं जिंकली. परंतु चित्रपटासाठी ऑनस्क्रीन रोमान्स करताना अहान पांडे आणि अनित पड्डा ऑफस्क्रीनसुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं कळतंय. हे दोघं खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत आहेत.

Saiyaara : 'सैयारा' जोडीचा रिअल-लाइफ रोमान्स; अहान पांडे खऱ्या आयुष्यात पडला हिरोइनच्या प्रेमात
अहान पांडे, अनित पड्डाImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 21, 2025 | 12:41 PM
Share

मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. 18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. या चित्रपटातून अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अहान हा अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे. पहिल्याच चित्रपटातून अहान आणि अनितच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय. ऑनस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री हिट ठरलीच, पण आता ऑफस्क्रीनसुद्धा दोघं एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं कळतंय. अहान आणि अनित खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत असल्याचं कळतंय.

यशराज फिल्म्स निर्मित आणि मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अ मूमेंट टू रिमेंबर’ या कोरियन चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल 577 कोटी रुपयांची कमाई केली होती. 2025 या वर्षातील हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्यानंतर ओटीटीवरही त्याला दमदार प्रतिसाद मिळाला. सध्या नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट स्ट्रीम होत आहे. अहान आणि अनित यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री या चित्रपटाच्या यशामागील कारणांपैकी एक आहे. ऑनस्क्रीन एकत्र काम करताना हे दोघं ऑफस्क्रीनसुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. परंतु त्यांनी त्यांचं रिलेशनशिप इतक्यात सार्वजनिक न करण्याचं ठरवलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ahaan Panday (@ahaanpandayy)

‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार अहान आणि अनित हे त्यांचं नातं इतक्यात जगजाहीर करणार नाहीत. या दोघांच्या करिअरमधील हा पहिलाच मोठा चित्रपट होता. त्यामुळे यापुढील करिअरची बाब लक्षात घेता त्यांनी रिलेशनशिप जाहीर न करण्याचं ठरवलं आहे. ‘सैयारा’च्या पार्टीदरम्यानही दोघांमधील जवळीक स्पष्ट दिसत होती. त्यानंतर एका मॉलमध्येही अहान आणि अनितला एकत्र शॉपिंग करताना पाहिलं गेलं.  मॉलमधील त्यांचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अहान अनितचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती कॅमेरे पाहून नाकारते. नंतर दोघांचा एकाच कारने प्रवास करतानाही व्हिडीओ समोर आला. विविध व्हिडीओंमध्ये त्यांच्यातील जवळीक स्पष्ट दिसली होती. ‘सैयारा’च्या या जोडीने आदित्य चोप्रासोबत तीन चित्रपटांची डील साइन केली आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहतेसुद्धा उत्सुक आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.