AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saiyaara सिनेमा चक्क चोरला? कथा चोरली की प्रेरणा घेतली? हॉलिवूड, इराणी नव्हे तर…?

बॉलीवूडमध्ये चित्रपट चोरीला प्रेरणा अर्थात Inspiration असं नाव देण्यात आलं आहे. मात्र ही काही नवीन गोष्ट नाही. ही वर्षानुवर्षे जुनी प्रथा आहे. इतर देशांच्या लोकप्रिय चित्रपटांच्या कथा आणि पात्रांवर आधारित अनेक हिंदी चित्रपट बनवले गेले आहेत. आता मोहित सुरीच्या सध्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'सैयारा' बद्दलही तीच चर्चा सुरू आहे. हा चित्रपट दक्षिण कोरियन चित्रपटाची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे. हे कितपत खरं आहे की खोटं, हे तुम्हाला माहिती आहे का?

Saiyaara सिनेमा चक्क चोरला? कथा चोरली की प्रेरणा घेतली? हॉलिवूड, इराणी नव्हे तर...?
सैयारा चित्रपट कॉपी केला आहे का ?Image Credit source: social media
| Updated on: Jul 23, 2025 | 7:23 PM
Share

दिग्दर्शक मोहित सुरी यांचा ‘सैयारा’ हा चित्रपट चोरीच्या कथेवर आधारित आहे का ? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय आहे. ‘सैयारा’ हा दक्षिण कोरियाचा खूप लोकप्रिय चित्रपट असलेल्या कोरियन भाषेतील ‘अ मोमेंट टू रिमेंबर’ (A Moment to Remember) या चित्रपटाची कॉपी असल्याचा आरोप केला जात आहे. पण हा आरोप कितपत खरा आहे ? विशेष गोष्ट म्हणजे, या प्रश्नावर मोहित सुरीकडून कोणतेही उत्तर आलेले नाही, तसेच संकल्प सदन आणि रोहन शंकर सारख्या सय्याराच्या लेखकांनीही यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया किंवा काहीच उत्तर दिलेलं नाही. संकल्प हा या चित्रपटाचा कथा आणि पटकथा लेखक आहे, तर रोहन शंकर यांनी संवाद लिहिले आहेत. सैयारा चित्रपट रिलीज झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच या चित्रपटाची कहाणी कॉपी केल्याचा मुद्दा सतत उपस्थित केला जात आहे. तरीही चित्रपटाच्या क्रिएटिव्ह टीमने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मात्र, कथा चोरीच्या या प्रकरणाचा प्रेक्षकांवर कोणताही परिणाम होत नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर लोकांना आकर्षित करत आहे. थिएटरमधील वातावरण भावनिक झालेलं दिसत आहे. सैयारा हा आजच्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणादायी चित्रपट बनला आहे. चित्रपटाची कथा आणि आहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या भूमिकांनी तरुणांच्या हृदयावर आणि मनावर एक अनोखी जादू केली आहे. अल्झायमरने ग्रस्त असलेली एका मुलगी आणि तिच्याशी समर्पित असलेल्या एका तरुणाच्या प्रेमाने लोकांना मोहित केले आहे. हा चित्रपट म्हणजे आजच्या काळातला (दुसरा) डीडीएलजे आहे, असंही म्हटलं जात आहे. या चित्रपटाच्या यशामुळे आजच्या चित्रपटांमध्ये क्रूरतेऐवजी प्रेम आणि करुणा परत येऊ शकते, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

अ मोमेंट टू रिमेंबर ची कॉपी आहे सैयारा ?

असो, आता आपण मुख्य प्रश्नाकडे येऊया. सैय्यारा हा कोरियन चित्रपट ‘अ मोमेंट टू रिमेंबर’ ची कॉपी आहे का? जर याचं उत्तर हो असं असेल तर (ती कॉपी) किती प्रमाणात? आणि या कॉपी संस्कृतीत आपले बॉलिवूड किती प्रामाणिक राहिले आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम, सैय्यारा आणि अ मोमेंट टू रिमेंबरमधील साम्य काय आहेत पाहूया. अ मोमेंट टू रिमेंबर हा कोरियन चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता. हा दक्षिण कोरियाचा एक क्लासिक चित्रपट आहे. पण खरं सांगायचं झालं तर हा चित्रपटदेखील एका जपानी टीव्ही मालिकेच्या कथेपासून प्रेरित होता. याचा अर्थ असा की तिथेही मौलिकतेचे संकट होते. मात्र तेव्हा या चित्रपटाने कोरियासह जपानमध्येदेखील खूप लोकप्रियता मिळवली होती. टर्की आणि मलेशियामध्ये देखील यावरून प्रेरणा घेऊन चित्रपट बनवण्यात आले.

म्हणजेच, अल्झायमरने ग्रस्त असलेल्या एका तरुणीची कहाणी आधीच सुपरहिट झाली होती. त्यामुळे, सैयाराच्या टीमला त्या कहाणीचा हिंदीमध्ये वापर करून पाहण्यात कोणताही धोका वाटला नाही. सुमारे वीस वर्षांनंतर, बरेच लोक ती विसरले असतील असा विचारही त्यांनी कदाचित ही कहाणी उचलताना केला असेल. पण असं झालं नाही. सैयारा प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, 2008 सालच्या सुरुवातीला अजय देवगण आणि काजोल यांच्या ‘यू, मी अँड हम’ या चित्रपटात अल्झायमरने ग्रस्त असलेल्या मुलीची कहाणी दाखवण्यात आली होती. त्या चित्रपटाची खूप चर्चा झाली नसली तरी त्याने फार नुकसानही झालं नाही. हा चित्रपट खुद्द अजय देवगण यानेच दिग्दर्शित केला होता.

दोन्ही चित्रपटांत कॉमन काय ?

सैयारा हा कोरियन चित्रपट ‘अ मोमेंट टू रिमेंबर’ ची कॉपी वाटू नये यासाठी दिग्दर्शक आणि लेखकाने खूप प्रयत्न केले आहेत, परंतु अनेक दृश्ये तशीच आहेत तसेच कथेतील ट्विस्ट देखील तसेच ठेवले आहेत. सैय्यारा चित्रपटातील स्त्री पात्राचे नाव वाणी बत्रा आहे आणि ती पत्रकार आहे, कविता आणि गाणी लिहिते पण तिला विसरण्याची सवय आहे म्हणजेच तिला अल्झायमर आहे. तिला या आजाराबद्दल नंतर कळते. ती अनेकदा तिची गाणी असलेली डायरी जिथे ठेवते तिथून डायरी उचलायला विसरते. आणि ही डायरी नेहमीच तिचा बॉयफ्रेंड शोधतो, जो रॉकस्टार बनण्यासाठी धडपडत असतो. तिने लिहिलेले गाणे पाहून तो गाणे म्हणू लागतो.

‘अ मोमेंट टू रिमेंबर’ या चित्रपटामध्येही असंच काहीसं घडतं. सुझान नावाची एक तरुणी एका दुकानातून कोल्ड्रिंक खरेदी करते, पण नंतर तिला कळते की तिने दुकानाच्या मालकाला पैसे दिले होते पण कोल्ड्रिंक तिथेच सोडले होते. अशा घटना तिच्यासोबत एकदा नाही तर अनेक वेळा घडतात. दरवेळेस कोल्डड्रिंक किंवा पर्स तिच्या बॉयफ्रेंडच्या हाथी लागतं, आणि तो ते परत द्यायला येत असतो.

‘सैयारा’ चित्रपटात असं दाखवण्यात आलं आहे की वाणी बत्रा (अनित पड्डा) ही हळूहळू गायक क्रिश कपूरच्या (अहान पांडे) खूप जवळ येते आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागतात. पण जेव्हा वाणी एका विवाहित पुरूषाला भेटते तेव्हा ती तिच्या माजी वाग्दत्त वराला भेटल्यानंतर क्रिशला विसरून जाते आणि त्याच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त करते. इथे अनेक शॉट्स जसेच्या तसे घेतले आहेत. वाणी ही तिच्या माजी वाग्दत्त वरासमोर अगदी तशीच रिॲक्ट जशी अ मोमेंट टू रिमेंबरमध्ये सुझन वागते. एवढंच नव्हे तर सैयारा मध्ये ती मुलगी ( वाणी) ज्या पद्धतीने तिच्या प्रियकरापासून तिचा आजार लपवते, तसेच ‘अ मोमेंट टू रिमेंबर’ मध्येही दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाचा शेवटही जवळजवळ एकसारखाच आहे.

दोन्ही चित्रपटांत फरक काय आहे ?

सैयारा आणि अ मोमेंट टू रिमेंबरमध्ये काही समानता असल्या, काही फरक देखील आहेत. दिग्दर्शक आणि लेखकाने स्त्री पात्रासोबत भावना जपण्याचा अतिशय हुशारीने प्रयत्न केला आहे. ‘अ मोमेंट टू रिमेंबर’मधील सुझानच्या व्यक्तिरेखेत फारशी छेडछाड केलेली नाही. त्यामुळे सुझान आणि वाणी जवळजवळ सारख्याच आहेत. पण सैयारामधील नायकाचे आयुष्य कोरियन चित्रपटातील नायकापेक्षा पूर्णपणे वेगळे दाखवले आहे. ‘अ मोमेंट टू रिमेंबर’ चित्रपटामध्ये नायक हा सुझानच्या वडिलांच्या कंपनीत एक सामान्य कर्मचारी दाखवला आहे, जो नंतर आर्किटेक्ट बनतो.तर ‘सैयारा’ चित्रपटाचा नायक रॉकस्टार बनण्यासाठी संघर्ष करताना दाखवलाआहे. तो एक स्ट्रीट सिंगर आहे आणि एके दिवशी मोठा रॉकस्टार बनण्याची त्याची इच्छा असल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

आपण असे म्हणू शकतो की कोरियन चित्रपटाचा नायक जो आर्किटेक्ट बनू इच्छितो तो सैयारामध्ये रॉकस्टार बनू इच्छितो. अ मोमेंट टू रिमेंबरच्या नायकाप्रमाणे, सैयारामधील नायक देखील अल्झायमरने ग्रस्त असलेल्या त्याच्या मैत्रिणीला प्रत्येक पावलावर साथ देतो आणि तिचा जीवनसाथी बनतो. पण मोहित सुरीने सैयाराच्या नायकाच्या भूमिकेला रणबीर कपूरच्या रॉकस्टार आणि त्याच्या स्वतःच्या चित्रपट ‘आशिकी २’ आणि ‘एक व्हिलन’ मधील पुरुष नायकांचे कॉकटेल बनवले आहे. तसं, ‘सैय्यारा’च्या दिग्दर्शक-लेखकाने अतिशय हुशारीने आजकलाच्या हिंसाचारावर आधारित चित्रपटांपेक्षा, या चित्रपटात शब्द आणि भावनांना जास्त महत्त्व दिले आहे. लोकांना चित्रपटाचा हा पैलू आवडला आहे.

या फिल्मी चोरीला इस्पिरेशन म्हणतात

दिग्दर्शक मोहित सुरी यांना याचा फायदा झाला आहे. सैयारा मध्ये सर्जनशील स्वातंत्र्य स्पष्टपणे दिसून येते. संगीत आणि कवितेसह प्रेमकथा तयार करून मोहित सुरी यांनी नवीन पिढीला हादरवून टाकले आहे. या चित्रपटाने आजच्या नवीन पिढीच्या भावनांना स्पर्श केला आहे, जी सोशल मीडियावरील हलक्याफुलक्या भावनांच्या लाटेने वाहून जाते. मात्रस मोहित सुरीवर यापूर्वीही परदेशी चित्रपटांच्या कथानकाचे रूपांतर केल्याचा आरोप झाला आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे.

बॉलीवूडमध्ये याला प्रेरणा अर्थात Inspiration म्हणतात. काही चित्रपट निर्माते असे घोषित करतात की त्यांनी एका विशिष्ट परदेशी चित्रपटाचा रिमेक बनवला आहे. उदाहरणार्थ, आमिर खानने ‘द फॉरेस्ट गंप’चा ‘लाल सिंग चड्ढा’ हा हिंदी रिमेक बनवला आणि अलीकडेच स्पॅनिश ‘चॅम्पियन्स’चा ‘सितारे जमीन पर’ हा रिमेक बनवला.

पण काही चित्रपट निर्माते त्याची (रिमेकची) घोषणा करत नाहीत. बॉलिवूडमध्ये, चित्रपट निर्माते काहीतरी ओरिजनल बनवण्यास घाबरतात. हिट फॉर्म्युला वापरून पाहण्याचा ट्रेंड आहे. कॉपी केल्यानंतरही ते प्रेरणा किंवा रूपांतर जाहीर करत नाहीत. हे खुद्द समीक्षकांनी सांगितले आहे. ही परंपरा बॉलिवूडमध्ये वर्षानुवर्षे जुनी आहे. बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’वरही ‘द सायकल थीव्हज’ या चित्रपटाचा प्रभाव असल्याचे म्हटले जाते. देव आनंद, फिरोज खान, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, मन्सूर खान, एन. चंद्रा, सुभाष घई यांसारख्या दिग्दर्शकांनीही आपापल्या पद्धतीने ही परंपरा पुढे नेली.

तसेच बहुचर्चित ‘शोले’ हा चित्रपट अनेक परदेशी चित्रपटांचे मिश्रण होता. सलीम-जावेद यांच्यावरवर अजूनही प्रश्न उपस्थित केले जातात. येथे चित्रपट चोरीला Inspiration असे नाव देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, सैयाराचा दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या ‘मर्डर 2’ चित्रपटाची कथा ‘द चेझर’ वरून प्रेरित होती, तर लोक ‘एक व्हिलन’ ला ‘आय सॉ द डेव्हिल’ ची कॉपी म्हणत होते.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.