Video : आधी मला माझी जानू म्हणायची, बबड्या, पिल्लू, बाळ्या…साजन बेंद्रेचं धूमाकूळ घालणारं ऐकलं का शंकरपाळ्या?

मराठी संगीत क्षेत्रातील नामवंत संगीतकार साजन बेंद्रे (Sajan Bendre) यांच आला बाई शंकरपाळ्या (Aala Bai Shankarpalya) हे गाणं सध्या सोशल मीडियावर धूमाकुळ घालताना दिसत आहे.

Video : आधी मला माझी जानू म्हणायची, बबड्या, पिल्लू, बाळ्या...साजन बेंद्रेचं धूमाकूळ घालणारं ऐकलं का शंकरपाळ्या?
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 7:36 PM

मुंबई : मराठी संगीत क्षेत्रातील नामवंत संगीतकार साजन बेंद्रे (Sajan Bendre) यांच आला बाई शंकरपाळ्या (Aala Bai Shankarpalya) हे गाणं सध्या सोशल मीडियावर धूमाकुळ घालताना दिसत आहे. या गाण्याला यू ट्युबवर 4 लाख 64 हजारहून अधिक लोकांनी आतापर्यंत बघितले आहे. यापूर्वीही साजन बेंद्रे यांचे आमदार झाल्यासारखं वाटतं, राडा राडा, शालू नाच नाच, बोल में हलकी बजाऊ क्या हे गाणे हिट झाले आहेत. (Sajan Bendre’s song Aala Bai Shankarpalya has been watched by 4 lakh 64 thousand people till now)

विशेष म्हणजे साजन बेंद्रे यांचे सातवीपर्यंतच शिक्षण झाले आहे. विधानसभा निवडणूकीवेळी सत्ता संघर्ष मोठ्या प्रमाणात झाला होता त्या पार्श्वभूमीवर या…या…या…बसा आमच्या बोकांडी हे गाणे देखील साजन बेंद्रे यांनी लिहिले आणि गायले होते. साजन बेंद्रे चालू घडामोडीवर गाणे तयार करतात आणि त्यांची गाणे सोशल मीडियावर धूमाकुळ देखील घालतात.

मध्यंतरी सोशल मीडियावर शंकरपाळ्या हे वाक्य खूप गाजले त्याचे झाले असे की, महाराष्ट्रातील कळंबेश्वर ता. मेहकर जिल्हा बुलडाणा येथील दोन चिमुकल्यांच्या भांडणे झाली होती. दोघेही अगदी निरागस पण भांडण करत होते. मात्र या दोघांनी महाराष्ट्राला वेड लावलं होतं. गल्लीत खेळत असताना या मुलांमध्ये भांडणे झाली होती. त्यावेळी त्यातील एक मुलगा दुसऱ्याला शंकरपाळ्या म्हणून चिडवतो.

दुसरा मुलगा रागाने त्याच्या अंगावर धावून जातो. दरम्यान, या मुलांच्या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल झाला होता. त्यावेळी शंकरपाळ्या नावाचा हॅशटॅग वापरला जात होता. त्या मुलाच्या डायलॉगवर मीम्स देखील बनले होते. आणि याच शंकरपाळ्या शब्दाला फोकस करून साजन बेंद्रे यांनी आला बाई शंकरपाळ्या हे गाणे लिहिले आहे. महाराष्ट्रातील प्रसिध्द जोडी विशाल-साजन यांच हे गाणं आहे.

संबंधित बातम्या : 

Marathi Movie : ‘इमेल फिमेल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मिळणार हास्याची मेजवानी

Marathi Movie : ‘हिरकणी’नंतर सोनाली साकारणार ‘महाराणी ताराबाई’, उलगडणार इतिहासाचं आणखी एक पान

Marathi Movie : पूजा सावंत-गश्मीर महाजनीच्या ‘लव्ह स्टोरी’चं गुपित अखेर उलगडलं!

(Sajan Bendre’s song Aala Bai Shankarpalya has been watched by 4 lakh 64 thousand people till now)

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.