AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sakshi Tanwar: राम कपूरशी जोडलं साक्षी तंवरचं नाव; जाणून घ्या का केलं नाही लग्न?

साक्षीने आठ वर्षांपर्यंत 'कहानी घर घर की' या मालिकेत काम केलं होतं. याच मालिकेदरम्यान निर्माती एकता कपूरने साक्षीला दुसऱ्या शोची ऑफर दिली.

Sakshi Tanwar: राम कपूरशी जोडलं साक्षी तंवरचं नाव; जाणून घ्या का केलं नाही लग्न?
Ram Kapoor and Sakshi TanwarImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 12, 2023 | 12:04 PM
Share

मुंबई: साक्षी तंवर हे टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. अभिनयविश्वातील साक्षीचा प्रवास हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. दूरदर्शनपासून सुरुवात केल्यानंतर तिने स्टार प्लस, सोनी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. त्यानंतर तिने बॉलिवूड आणि ओटीटीवरही काम केलं. त्याच वेळी साक्षीच्या रिलेशनशिप आणि डेटिंगविषयी चर्चा सुरू झाली. मात्र साक्षीने त्याकडे दुर्लक्ष केलं. ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतील सहकलाकार राम कपूरशी तिचं नाव जोडलं गेलं.

आठ वर्षांची मेहनत

साक्षीने आठ वर्षांपर्यंत ‘कहानी घर घर की’ या मालिकेत काम केलं होतं. याच मालिकेदरम्यान निर्माती एकता कपूरने साक्षीला दुसऱ्या शोची ऑफर दिली. मात्र आठ वर्षे मालिकेत काम केल्यानंतर साक्षीने काही काळ ब्रेक घेण्याचं ठरवलं होतं. जवळपास अडीच वर्षे ब्रेक घेतल्यानंतर ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतून तिने पुनरागमन केलं.

ज्यावेळी साक्षी ‘कहानी घर घर की’ या मालिकेत काम करत होती, तेव्हा राम कपूर हा ‘कसम से’ या मालिकेत भूमिका साकारत होता. विशेष म्हणजे या दोन्ही मालिकांचं सेट अगदी जवळजवळ होतं. त्यावेळी दोघांची अनेकदा भेट व्हायची. मात्र भविष्यात एकत्र काम करू, असं त्यांना वाटलंच नव्हतं.

View this post on Instagram

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor)

बडे अच्छे लगते है मालिकेची ऑफर

2011 मध्ये ब्रेक संपल्यानंतर साक्षीने एकता कपूरची ऑफर स्वीकारण्याचं ठरवलं. या मालिकेत तिच्यासोबत राम कपूर मुख्य भूमिका साकारणार असल्याचं जेव्हा तिला समजलं, तेव्हा तिच्या मनात प्रश्न उपस्थित झाले. आपली जोडी चांगली दिसेल का, केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडेल का असे प्रश्न तिच्या मनात होते. मात्र मालिका जेव्हा ऑन-एअर झाली तेव्हा राम कपूर आणि साक्षी तंवर या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली.

या मालिकेच्या शूटिंगदरम्यान राम आणि साक्षीच्या रिलेशनशिपची जोरदार चर्चा होती. मात्र त्याबद्दल साक्षी किंवा रामने कधीच प्रतिक्रिया दिली नाही. राम कपूरने अभिनेत्री गौतमी कपूरशी लग्न केलं. मात्र साक्षी आजही अविवाहित आहे. पण तिनं एका मुलीला दत्तक घेतलंय. आपल्याला अजूनही मनासारखा जोडीदार सापडलेला नसल्यामुळे लग्न केलं नाही, असं साक्षीनं अनेकदा आपल्या मुलाखतींमधून सांगितलंय.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...