AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान – विवेक यांच्या भांडणावर सलीम खान म्हणाले, ‘दोघांची भांडणं, ती तिसऱ्यासोबत…’

Salim Khan: 'दोघांची भांडणं, ती तिसऱ्यासोबत...', ऐश्वर्या राय हिच्यामुळे सलमान – विवेक यांच्यात वाद, सलीम खान यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत... सलीम खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

सलमान – विवेक यांच्या भांडणावर सलीम खान म्हणाले, 'दोघांची भांडणं, ती तिसऱ्यासोबत...'
| Updated on: Nov 24, 2024 | 10:42 AM
Share

Salim Khan: अभिनेता सलमान खान याचे वडील आणि लेखक सलीम खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये सलीम खान यांचं फार मोठं योगदान आहे. सलीम खान यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांसाठी काम केलं आहे. सलीम खान फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. कुटुंबियांबद्दल देखील सलीम खान अनेक गोष्टी सांगत असतात. मुलगा सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील सलीम खान यांने अनेकदा मोठे खुलासे केले आहेत.

एका मुलाखतीत सलीम खान यांनी अभिनेता सलमान खान आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यामध्ये असलेल्या वादाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यामुळे दोघांमध्ये वाद आहेत. सांगायचं झालं तर, ऐश्वर्या हिने सलमान आणि विवेक दोघांना देखील डेट केलं आहे. पण अभिनेत्रीने लग्न अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत केलं. यावर सलीम खान यांनी मोठं वक्तव्य केलं.

एका मुलाखतीत सलीम खान म्हणाले, ‘काही विषय भावनात्मक असतात. त्यावर कोणतंही समाधान नसतं. सलमान आणि विवेक दोघे देखील तेव्हा भावनात्मक होते. दोघांना नंतर जाणीव होईल की, कोणताच अर्थ नसलेल्या गोष्टीवर त्यांचे वाद झाले आहेत. दोघांमध्ये जिच्यामुळे वाद झाले, तिला तर तिसराच घेऊन गेला आणि दोघे तिथेच राहिले…’ असं वक्तव्य सलीम खान यांनी केलं. पण सलीम खान यांनी कुठेच ऐश्वर्या राय हिचं नाव घेतलं नाही…

सलीम खान यांचं वक्तव्य तुफान चर्चेत आलं. सलीम खान कुटुंबातील इतर सदस्यांबद्दल देखील सांगत असतात. सलमान खान याच्या लग्नाबद्दल देखील सलीम खान यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. 2009 मध्ये झालेल्या एका मुलाखतीत सलीम खान म्हणाले होते, ‘पुढच्या दोन वर्षात सलमान खान लग्न करू शकतो. पुढच्या दोन वर्षांत त्याने लग्न केलं नाही तर, पुढे कठीण आहे…’ आज वयाच्या 58 व्या वर्षी देखील अभिनेता एकटाच आयुष्य जगत आहे.

सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, भाईजानच्या आयुष्यात अनेक सेलिब्रिटी महिलांची एन्ट्री झाली. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यापासून अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यापर्यंत अभिनेत्याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...