AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आराध्या बच्चन हिच्याबद्दल सलमान खानचं मोठं वक्तव्य, ‘मी आराध्याचा काका आणि…’

Salman Khan | ऐश्वर्या रायची लेक आराध्या बच्चन हिच्याबद्दल सलमान खान याचं मोठं वक्तव्य, ऐश्वर्या - अभिषेक बच्चन यांना देखील म्हणाला..., कायम रंगलेली असते सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा... सोशल मीडियावर देखील होत असतात दोघांचे अनेक व्हिडीओ व्हायरल

आराध्या बच्चन  हिच्याबद्दल सलमान खानचं मोठं वक्तव्य, 'मी आराध्याचा काका आणि...'
| Updated on: Jun 22, 2024 | 12:05 PM
Share

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, आजही अनेक ठिकाणी सलमान एक्स-गर्लफ्रेंड ऐश्वर्या हिच्याबद्दल बोलताना दिसतो. सांगायचं झालं तर, ऐश्वर्या – सलमान यांनी एकमेकांना जवळपास 6 वर्ष डेट केलं. पण दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट होता. पण आजही अभिनेता ऐश्वर्या हिचा आदर करतो.

ब्रेकअपनंतर सलमान – ऐश्वर्या कधीच एकत्र दिसले नाहीत. शिवाय कोणत्या कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी दोघे अनेकदा आले, पण कधी एकमेकांच्या आमने-सामने आले नाहीत. पण एक काळ असा होता, जेव्हा प्रत्येक ठिकाणी सलमान आणि ऐश्वर्या एकत्र दिसले.

सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं. 2011 मध्ये ऐश्वर्या हिने आराध्या बच्चन हिला जन्म दिला. ऐश्वर्या हिने आराध्या हिला जन्म दिल्यानंतर सलमान खान याने मोठं वक्तव्य केलं होतं.

2011 मध्ये एका मुलाखतीत सलमान खान याने ऐश्वर्या हिच्या प्रेग्नेंसीवर मोठं वक्तव्य केलं होतं. ‘मी ऐश्वर्या – अभिषेक यांना शुभेच्छा देतो. ऐश्वर्या – अभिषेक यांना सात मुलं व्हावी, त्यांची पूर्ण क्रिकेट टीम असावी… अशी माझी इच्छा आहे…’ आराध्या हिच्याबद्दल देखील सलमान याने खास वक्तव्य केलं होतं.

‘मी काका झालो आहे आणि मिस्टर अमिताभ बच्चन यांना आजोबा झाल्यामुळे शुभेच्छा देतो…’ असं देखील सलमान खान म्हणाला होता. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी एक कार्यक्रम पार पडला होता, तेव्हा सलमान खान याला पाहाताच अभिषेक याने मिठी मारली…

जया बच्चन यांचं सलमान खान याच्याबद्दल वक्तव्य…

सलमान खान याच्याबद्दल अभिनेत्री जया बच्चन यांना एक तक्रार आहे. ‘सलमान खान याने आजपर्यंत कधीच मला चरणस्पर्श नमस्कार केला नाही…’ असं वक्तव्य एका मुलाखतीत जया बच्चन यांनी केलं होतं. सांगायचं झालं तर बच्चन कुटुंब आणि सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं.

सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या आजही कमी झालेली नाही. अभिनेता कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सलमान खान याच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाची एन्ट्री झाली. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.