AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानने अखेर संरक्षण कवच घेतलं, बुलेटप्रूफ कारची चर्चा, धमक्यांमुळे पोलीसही अलर्ट

बॉलिवूडस्टार सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्याने मोठा निर्णय घेतला.

सलमान खानने अखेर संरक्षण कवच घेतलं, बुलेटप्रूफ कारची चर्चा, धमक्यांमुळे पोलीसही अलर्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 07, 2023 | 1:05 PM
Share

ब्रिजभान जैस्वार, मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman khan) गेल्या काही दिवसांपासून फक्त बॉलिवूडप्रेमींमध्येच (Bollywood) नाही तर संपूर्ण गृहखात्यात चर्चेत आहे. सलमान खानला एकामागून एक मिळणाऱ्या धमक्यांनी मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे. तसं तर सलमान खानला यापूर्वीही धमक्या आल्या आहेत, मात्र यावेळी त्याची अधिक गांभीर्यानं दखल घेतली जात आहे. खबरदारी म्हणून सलमान खाननं नुकतंच स्वतःसाठी एक संरक्षण कवच अर्थात बुलेट प्रूफ कारची खरेदी केली आहे. जेणेकरून घराबाहेर पडल्यानंतर काही घटना घडलीच तर या कारद्वारे सलमान खान स्वतःचा बचाव करू शकेल.

कोणती कार घेतली?

सलमान खानने निसान पेट्रोल एसयूव्ही कार स्वतःच्या ताफ्यात समाविष्ट केली आहे. सद्या ही कार भारतीय बाजारपेठेत लाँचदेखील झाली नाहीये. पण वारंवार येणाऱ्या धमक्यानंतर सलमान खानने ही कार खरेदी केली आहे. Nissan Patrol SUV ही कार सलमानने आयात केली आहे. दक्षिण आशियाई बाजारपेठेत ही कार सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही मानली जाते. बुलेटप्रूफ असलेली ही कार सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

जीवे मारण्याच्या धमक्यांचं सत्र

अभिनेता सलमान खानला यापूर्वी दोन ते तीन वेळा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. वर्ष 2019 मध्ये लॉरेन्स बिष्णोईनं धमकावलं होतं. एवढंच नव्हे, तर त्याला जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र त्याचे वडील सलीम खान यांना मिळालं होतं. काही महिन्यांपूर्वी आलेल्या धमकीच्या पत्रात सिद्धू मुसेवाला सारखीच तुमची अवस्था करू, असे शब्ददेखील वापरण्यात आले होते. काळवीट शिकार प्रकरणी सलमाननं माफी मागावी, अन्यथा परिणामांना सामोरं जाण्यासाठी तयार रहावं, असं या धमकीत म्हटलं गेलं होतं. 5 जून2022 रोजी सलीम खान यांना सकाळी 7.30 ते 8 .00 वाजताच्या दरम्यान धमकीचे पत्र मिळाले होते . या प्रकरणी बांद्रा पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला होता . त्यानंतर सलमान खानला धमकीचा ईमेल 18 मार्च 2023 रोजी आला होता ..त्यात संदेश होता… गोल्डी ब्रारला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यानंतर सलमानच्या मॅनेजर प्रशांत गुंजाळकरच्या तक्रारींवर मुंबई पोलिसांनी 19 मार्च रोजी गुन्हा दाखल केला होता . या लागोपाठ धमक्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढविण्यात आली.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.