AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आम्ही पीडितांच्या कुटुंबासोबत…”, अहमदाबाद विमान अपघातानंतर सलमान खानचा मोठा निर्णय

एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर सलमान खान आणि त्याच्या टीमने मोठा निर्णय घेतला आहे. एक प्रेसनोटद्वारे निर्णय सांगण्यात आला आहे. तसेच 'या दुःखाच्या वेळी आम्ही पीडितांच्या कुटुंबासोबत आहोत...' असं म्हणतं अपघाताबद्दल शोकही व्यक्त केला आहे.

आम्ही पीडितांच्या कुटुंबासोबत..., अहमदाबाद विमान अपघातानंतर सलमान खानचा मोठा निर्णय
Salman Khan canceled his show after Air India plane crashImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 12, 2025 | 5:57 PM
Share

अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताने सर्वांना धक्का बसला आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच बॉलिवूड देखील या घटनेनं हादरलं आहे. सेलिब्रिटी देखील या घटनेबाबत शोक व्यक्त करत आहेत. अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

 एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर सलमान खानचा मोठा निर्णय 

दरम्यान, आता या घटनेनंतर सलमान खानने देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याने त्याचा एक कार्यक्रम रद्द केला आहे. सलमान सुपरस्टार इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या लाँच कार्यक्रमात सहभागी होणार होता पण आता विमान अपघातानंतर त्याने कार्यक्रम आयोजकांसह तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मुंबईत एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. अपघाताची बातमी पसरल्यानंतर, टीमने पत्रकारांना संबोधित केले आणि कार्यक्रम रद्द केला.

‘या दुःखाच्या वेळी आम्ही पीडितांच्या कुटुंबासोबत आहोत…’

कार्यक्रमाच्या आयोजकांनी एक प्रेस नोट देखील पाठवली आहे. त्यांनी म्हटलं आहे “तुम्हाला माहिती आहेच की, आदल्या दिवशी एक दुःखद घटना घडली. हा सर्वांसाठी एक दुःखद क्षण आहे. या कठीण काळात ISRL आणि सलमान खान देशासोबत एकजुटीने उभे आहेत. हा उत्सव साजरा करण्याची वेळ नसल्यामुळे आम्ही कार्यक्रम पुढे ढकलण्याचा संयुक्त निर्णय घेतला आहे. या दुःखाच्या वेळी आम्ही पीडितांच्या कुटुंबासोबत आहोत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. खंबीर राहा.

विमान अपघाताने बॉलिवूड स्टार्संनाही धक्का

अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल अनेक बॉलिवूड स्टार्सनी शोक व्यक्त केला आहे. अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले ‘एअर इंडियाच्या अपघाताने मी धक्का बसलो आहे. मी सध्या फक्त प्रार्थना करत आहे.’ सनी देओलने लिहिले ,”अहमदाबादमधील दुःखद विमान अपघाताची बातमी ऐकून मी दु:खी आणि अजूनही धक्क्यात आहे. सर्व प्रवाशांसोबत, त्यांच्या कुटुंबियांसह आणि प्रभावित झालेल्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. या कठीण काळात, मी सर्वांसाठी मनापासून प्रार्थना करत आहे.’ अशा अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.