भावाच्या निधनाने सलमान खानला मोठा धक्का, फोटो पोस्ट करत म्हणाला, ‘तू या जगातून निघून गेलास आणि…’
सलमान खानला मोठा धक्का, भावाच्या निधनानंतर कोलमडला भाईजान, फोटो पोस्ट करत म्हणाला, 'तू या जगातून निघून गेलास आणि...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सलमान खान याच्या खास मित्राचं निधन झालं आहे. सुशील कुमारच्या निधनानंतर सलमानला मोठा धक्का बसला आहे. सलमान याने सुशील याच्यासोबत खास फोटो पोस्ट करत जवळच्या मित्राला श्रद्धांजली वाहिली आहे. फोटो पोस्ट करत सलमान खान म्हणाला, ‘गेल्या 42 वर्षांपासून तो माझ्यासोबत माझ्या भावासारखा राहिला. तो सर्वात थोर, दयाळू आणि मदतशील माणूस होता. काळ कितीही कठीण असला तरी, तो नेहमी हसतमुख, नाचत आणि निश्चिंत असायचा. आर्थिक, भावनिक किंवा शारीरिक समस्या असोत, तो नेहमी म्हणायचा की, “काही फरक पडत नाही, त्रास होणार नाही, सर्व काही ठीक होईल.’
‘त्याचं नव सुशील कुमार होतं. जवळपास 5 मिनिटांपूर्वी तो याठिकाणी होता… तुला अखेरचा निरोप भाई… एक खऱ्या मर्दाप्रमाणे तू आयुष्य जगला आणि मृत्यूशी देखील मोठ्या हिंमती लढलास. भाई तुझ्यासाठी डोळ्यात पाणी नाही… फक्त आठवणी आणि आनंद असेल… माझ्या भावाने हसत जगाचा निरोप घेतला. कोणाला आधी तर, कोणाला नंतर जायचंच आहे… पण कधी कोण जाईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. भावा आता तू तुझ्या सिगारेट आणि व्हिस्कीचा आनंद घे… चियर्स तुझी खूप आठवण येईल…’, असं म्हणत सलमान खान याने जवळच्या मित्राला अखेरचा निरोप दिला.
एवढंच नाही तर, सलमान खान याने आणखी एक फोटो पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या आहे. ‘ज्याला जायचं आहे, त्याला कधीच थांबवू नका… ज्याला बोलावणं आलं आहे, तो जाणारच आहे… बोलावण्याची चार कारणं आहेत, एक म्हणजे सर्वांना जायचं आहे. दुसरं, तो चांगल्या माणसांना लवकर बोलावतो… तिसरं कारण तुम्ही धरती मातेचं कर्ज, ईएमआय, जीएसटी नाही भरलं तर, ते भरण्यासाठी एक संधी… चौथं कारण म्हणजे, भ्रष्टाचार…’, असं सलमान खान म्हणाला.
सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच SVC63 सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ज्यामध्ये अभिनेत्यासोबत अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे… सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली यांच्या खांद्यावर आहे. सिनेमा 2027 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. तर ‘मातृभूमी’ सिनेमातून देखील सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे… सिनेमात चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत आहे.