AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

31 वर्षांपासून बेपत्ता अभिनेत्याच्या शोधात सलमानची एक्सगर्लफ्रेंड… 1,314,600 रुपये केले खर्च पण…

बॉलिवूड गाजवलेला लोकप्रिय अभिनेता 31 वर्षांपासून बेपत्ता... अभिनेत्याच्या शोधात सलमान खानच्या एक्सगर्लफ्रेंडने पाण्यासारखा पैसा खर्च केला... अखेर..., आजही अभिनेता कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत

31 वर्षांपासून बेपत्ता अभिनेत्याच्या शोधात सलमानची एक्सगर्लफ्रेंड... 1,314,600 रुपये केले खर्च पण...
| Updated on: Feb 07, 2026 | 2:17 PM
Share

बॉलिवूडमध्ये असे अनेक किस्से दडलेले आहेत, जे समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. अशाच एका रहस्यांपैकी एक म्हणजे अभिनेता राज किरण याच्या बेपत्ता झाल्याची बातमी समोर येणं. एक काळ बॉलिवूड गाजवलेला अभिनेता किरण राज गेल्या 30 वर्षांपासून बेपत्ता आहे. कुटुंबियांनी देखील माहिती नाही ती, राज किरण नक्की कुठे आणि कोणत्या परिस्थितीत आहे. अभिनेत्याला शोधण्यासाठी जेथे कुटुंबिय पूर्ण प्रयत्न करत होते, तेथे दुसरीकडे एका अभिनेत्रीने देखील अभिनेत्याला शोधण्यासाठी दिवस रात्र एक केली होती. पण अभिनेत्याचा शोध लागला नाही. अभिनेत्रीने राज याला शोधण्यासाठी 30 प्रायव्हेट डिटेक्टिव्ह ठेवले होते. तर लाखो रुपये खर्च केले.

राज किरण याला शोधण्यासाठी पुढाकार घेणार अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेता सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली आहे. अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्याच्या शोधात आहे. सांगायचं झालं तर, 70 च्या दशकात राज किरण प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले आहेत आणि ऋषी कपूरपासून ते शबाना आझमीपर्यंत सर्वांसोबत काम केलं आहे. “कर्ज” मध्ये त्यांनी ऋषी कपूरची पुनर्जन्मापूर्वीची भूमिका साकारली होती. या सिनेमादरम्यानच राज किरण आणि ऋषी कपूर यांची मैत्री झाली. “कर्ज” व्यतिरिक्त, राज किरण “अर्थ”, “एक नया रिश्ता,” “बसेरा,” आणि “वारीस” सारख्या सिनेमांमध्ये दिसले.

1999 मध्ये राज किरण याचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर कोणत्या सिनेमात किंवा कार्यक्रमात अभिनेता दिसला नाही. असं देखील सांगितलं जातं की, 1994 नंतर अभिनेता कुठे दिसलाच नाही… अभिनेत्याच्या कुटुंबानेही अनेक वर्षे त्याचा शोध घेतला आणि त्यानंतर 2011मध्ये राज किरणबद्दल विविध प्रकारच्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्यावर कुटुंबाला माध्यमांसमोर यावे लागले.

राज किरण नैराश्याने ग्रस्त असल्याची अफवा पसरली होती. त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. असंही म्हटलं जात होतं की राज किरण अटलांटातील एका मानसिक रुग्णालयात आहे. सोमी अली हिने दिलेल्या माहितीनुसार, ‘राज किरण याला शोधण्यासाठी शक्त ते प्रयत्न करत आहे… 20 वर्षांपेक्षा देखील अधिक काळ लोटला असेल, मी राज याला शोधत आहे… डॉक्टरांनी देखील गुपचूप माझी मदत केली. ज्यामुळे मला कळलं की, राज आता भारतात नाही…’

पुढे सोमी अली म्हणाली, ‘राज याला शोधण्यासाठी मी आईकडून तब्बल 13 लाख 14 हजार रुपये घेतले होते. तब्बल 30 डिटेक्टिव्ह कामासाठी लावले होते… त्यानंतर मी स्वतः राज याच्या शोधात अटलांटा येथे गेले…’ पण अभिनेत्याबद्दल कोणतीच माहिती समोर आली नाही.

Follow Us
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.