
Salman Khan Family: अभिनेता सलमान खान स्टारर ‘दबंग’ सिनेमाला 15 वर्ष पूर्ण झाली आहे. सिनेमात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक अभिनव कश्यप याच्या खांड्यावर होती. अभिनेता अरबाज खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होती. दुसरीकडे अरबाज याची पहिली पत्नी मलायका अरोरा हिने सिनेमात ‘मुन्नी बदनाम हुई’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आणि चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. पण मलायका हिले आयटम गर्ल म्हणून सिनेमात घेण्यास अरबाज याचा नकार होता.. याचा खुलासा नुकतात झालेल्या एका मुलाखतीत अभिनव कश्यप याने केला आहे.
अभिनव कश्यप म्हणाला, ‘खान ब्रदर्स असे कूल दिसतात पण ते एका रुढीवादी मुस्लिम कुटुंबातील आहेत… हेच खरं वास्तव आहे… मलायका हिला गाण्यात घेण्यासाठी अरबाज उत्साहित नव्हता… पत्नी आयटम गर्ल म्हणून ओळखली जाईल.. याची भीती त्याच्या मनात होती. अरबाज आणि सलमान एका रुढीवादी मुस्लिम कुटुंबातील आहे. मलायकाच्या कपड्यांबद्दल देखील सलमानच्या मनात मतभेद होते. त्याच्या घरातील महिलांना कायम पूर्ण कपड्यांमध्ये राहावं असं त्याला वाटतं. त्यामुळे मलायका हिने आयटम सॉन्ग करु नये अशी त्याची इच्छा होती.
पण मलायका एक खंबीर आणि स्वतंत्र महिला आहे, ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते. जेव्हा तिला हे गाणं ऑफर करण्यात आले तेव्हा तिने लगेच हो म्हटलं. अरबाजला पटवून देण्यासाठी तिला थोडा वेळ लागला. मलायकाने अरबाजला सांगितलं यामध्ये अश्लील असं काही नाही. फक्त डान्स आहे आणि गाण्यात सगळी आपलीच लोकं आहेत. मग भीती कसली? त्यानंतर या गाण्याने सर्व रेकॉर्ड मोडले…
अभिनव कश्यप म्हणाला, ‘गाणं खूप चांगल्या प्रकारे तयार झालं होतं. अशात सलमान खान याला देखील गाण्याचा एक भाग व्हायचं होतं. सलमान खान गाणं संपल्यानंतर एन्ट्री करेल असं ठरलं होतं. तोपर्यंत सोनू सूट पार्टी करेल. शोले मधील मेहबूबा या गाण्यात दाखवल्याप्रमाणे, अमजद खान मजा करत आहे. माझ्या मनातही तेच विचार आले.
हे गाणे सादर करण्याची ही एक उत्तम संधी होती, एका बाजूला पोलिस सापळा रचत आहेत आणि दुसऱ्या बाजूला खलनायक मजा करत आहे. पण सलमान आग्रह करू लागला की, गाणं सर्वात चांगलं आहे, मीही त्यात असायला हवं, म्हणून मी त्याला थोडे आधी गाण्यात एन्ट्री दिली.’ असं देखील अभिनव म्हणाला.
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 1998 मध्ये त्यांनी लग्न केलं आणि 2002 मध्ये मुलगा अरहान याचं जगात स्वागत केलं. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.