Rohit Sharma याला झालंय तरी काय? रुग्णालयातील ‘या’ व्हिडीओमुळे माजली खळबळ
Rohit Sharma in Hospital: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा रुग्णालयात पोहोचला आहे. क्रिकेटरचा रुग्णालयात पोहोचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Rohit Sharma in Hospital: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा याला काय झालं? त्याच्या प्रकृती विचारपूस सध्या प्रत्येक जण करत आहे. मुंबईतील एका रुग्णालयात पोहोचल्याचा रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. अखेर प्रश्न असा समोर येत आहे की, क्रिकेटरला नक्की झालं तरी काय आहे? हिटमॅनला रुग्णालयात जाण्याची गरज का पडली? यामागील कारण त्याच्याशी संबंधित आहे का की त्याच्या जवळच्या व्यक्तीची तब्येत बिघडली, ज्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तो रुग्णालयात गेला होता? सध्या या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप तरी समोर आलेली नाहीत.
रोहित शर्मा पोहोचला रुग्णालयात, चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न
सध्या रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो रुग्णालयात जाताना दिसत आहे. पण तो कोणत्या रुग्णालयात जात आहे हा पहिला प्रश्न आहे. तर रोहित शर्मा याला कोकिला बेन रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट करण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, रोहित शर्मा त्याच्या गाडीतून बाहेर येतो आणि रुग्णालयात जातो. व्हिडीओमध्ये त्यापुढे काय झालं कौद करण्यात आलेलं नाही.
Rohit Sharma spotted in Kokilaben hospital Mumbai.❤️ pic.twitter.com/bQ6zTuixGc
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) September 8, 2025
अशात रोहित रुग्णालयात का गेला हे स्पष्ट नसलं तरी, त्याला रुग्णालयात जाताना पाहून त्याच्या चाहत्यांना काळजी वाटणं देखील स्वाभाविक आहे. आता चाहते फक्त एकच प्रार्थना करत आहेत आणि ती म्हणजे हिटमॅनसोबत सर्व काही ठीक होईल.
सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा बेंगळुरू येथे होता. जिथे त्याने सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजेच NCA मध्ये त्याची फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी ही फिटनेस टेस्ट दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो आणि विराट कोहली टीम इंडियाचा भाग असू असेल… अशी माहिती देखील समोर येत आहे.
भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला रोहित शर्मा…
रोहित आणि विराट दोघे यांच्या वर्षाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघापासून दूर आहे. T20 आणि टेस्ट मध्ये दोघांनी निवृत्ती घेतली आहे. पण वनडेमध्ये अद्यापही सक्रिय आहे. रोहित याच्यासोबतच विराट कोहली याला देखील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना चाहत्यांना पाहायचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यासाठी विराटने लंडनमध्ये त्याची फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली.
