AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानने खरेदी केली करोडोंची बुलेटप्रूफ कार; गाडीत आहेत हे खास फिचर्स

सुपरस्टार सलमान खानने नुकतीच करोडोंची बुलेटप्रूफ मर्सिडीज-बेंझ मेबॅक GLS600 खरेदी केली आहे. नक्की काय आहे या कारचे वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

सलमान खानने खरेदी केली करोडोंची बुलेटप्रूफ कार; गाडीत आहेत हे खास फिचर्स
Salman Khan New Bulletproof Mercedes-Maybach GLS600Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 22, 2025 | 4:12 PM
Share

सुपरस्टार सलमान खानला वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. तो त्याच्या चित्रपटापेक्षाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी ओळखला जातो. तसेच तो खऱ्या आयुष्यात स्पष्टवक्तेपणा आणि शानदार शैलीसाठी ओळखल्या जातो. जसं की त्याला अगदी जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या तेव्हाही तो तेवढाच चर्चेत होता. तसेच तेव्हापासून त्याच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी देखील घेण्यात येत आहे. यात सुरक्षितेत आता भर पडली आहे ती म्हणजे एका बुलेटप्रूफ कारची. सलमानच्या गॅरेजमध्ये अनेक आलिशान कार आहेत आता त्या कलेक्शनमध्ये एक नवीन बुलेटप्रूफ कारची समाविष्ट झाली आहे.

चला जाणून घेऊया या कारबद्दल. कशी आहे ही कार?

मर्सिडीज-बेंझ मेबॅक GLS600

त्याच्या कलेक्शनमधील सर्वात नवीन बुलेटप्रूफ कार म्हणजे मर्सिडीज-बेंझ मेबॅक GLS600. या एसयूव्हीची किंमत 3.39 कोटी रुपये आहे. बुलेटप्रूफ आर्मरिंगसह या लक्झरी कारची किंमत सहजपणे 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त जाते. भारतातील अनेक सेलिब्रिटींकडे मेबॅक GLS600 आहे, परंतु सलमान खान अशी बुलेटप्रूफ कार असलेला कदाचित पहिलाच स्टार आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेले फोटो

सलमान खान त्याच्या मेबॅक GLS600 मध्ये दिसला. कार क्रेझी इंडियाने हे फोटो त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावरील एका फोटोमध्ये सलमान खान मर्सिडीज-मेबॅक GLS600 SUV च्या पुढच्या प्रवासी सीटवर बसलेला दिसतो. पोस्टमध्ये म्हटले आहे की ही त्याची नवीन मर्सिडीज-बेंझ GLS600 SUV आहे. तथापि, दुसऱ्या फोटोमध्ये, विंडशील्डवर 2024 चा रजिस्ट्रेशन स्टिकरही दिसत आहे.

मेबॅक

GLS600 हे GLS श्रेणीतील प्रमुख मॉडेल आहे, ज्यामध्ये लाउंज-शैलीतील सीटिंग, पॅनोरॅमिक सनरूफ, मागील-सीट मनोरंजन पॅकेज, कॉम्पॅक्ट रेफ्रिजरेटर, बर्मेस्टर ऑडिओ सिस्टम, व्हर्च्युअल असिस्टंट आणि बरेच काही समाविष्ट आहे. ही लक्झरी SUV 22-इंच अलॉय व्हील्सवर चालते, जी 23-इंच व्हील्समध्ये देखील अपग्रेड केली जाऊ शकते.

इंजिन आणि पॉवर

मेबॅक GLS600 मधील इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह एअर सस्पेंशन, ऑटोमॅटिक एक्सटेंडिंग साइड स्टेप्स, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा इत्यादींचा समावेश आहे. या लक्झरी एसयूव्हीला पॉवर देणारे 4.0-लिटर V8 टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे जे 550 bhp आणि 730 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे जे मर्सिडीजच्या 4Matic AWD सिस्टमद्वारे सर्व चार चाकांना पॉवर पाठवते. कामगिरीच्या बाबतीत, ते फक्त 4.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते आणि त्याचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.