AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या तुटल्या बरगड्या, भाईजन गंभीर जखमी, व्हिडीओ पाहून म्हणाल…

Salman Khan Health: सलमान खान याच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, भाईजानच्या दोन बरगड्या तुटल्या, गंभीर जखमी अभिनेता म्हणाला, 'बरगड्या तुटल्या आहेत म्हणून...', व्हिडीओ तुफान व्हायरल, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या प्रकृतीची चर्चा...

सलमान खानच्या तुटल्या बरगड्या, भाईजन गंभीर जखमी, व्हिडीओ पाहून म्हणाल...
| Updated on: Sep 06, 2024 | 11:38 AM
Share

अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी सिनेमे तर कधी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणारा सलमान खान आता प्रकृतीमुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्याला पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. सांगायचं झालं तर, 5 सप्टेंबर रोजी अभिनेता ‘बिग बॉस 18’ शोचा प्रोमो शूट करण्यासाठी पोहोचला होता. तेव्हा सलमान खानला पाहिल्यानंतर चाहत्यांनी आणि पापाराझींनी मोठी गर्दी केली.

काळा सूट आणि निळ्या रंगाच्या शर्टमध्ये सलमान खान याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण व्हिडीओमध्ये सलमान खान सतत त्याच्या बरगड्यांना हात लावताना दिसला. शिवाय अभिनेत्याने फोटोग्राफर्सना हळू फोटो क्लिक करण्यासाठी सांगितलं. सलमान खान म्हणाला, ‘सर्वांनी संभाळून आरामात फोटो घ्या… दोन बरगड्या तुटल्या आहेत….’

पण अभिनेत्याच्या बरगड्यांना नक्की काय झालं आहे कळू शकलेलं नाही. गंभीर दुखापत झाली असली तरी, अभिनेता ‘बिग बॉस 18’ शोच्या शुटिंगसाठी पोहोचला. सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट करत चिंता व्यक्त करत आहेत.

अभिनेता सलमान खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 58 व्या वर्षी देखील अभिनेता झगमगत्या विश्वात सक्रिय आहे. आजपर्यंत इंडस्ट्रीमध्ये सलमान खान याची जागा कोणताच अभिनेता घेऊ शकलेला नाही. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, भारताबाहेर देखील फार मोठी आहे.

अभिनेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘सिंकदर’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या दानवेंच
जिल्हा बँकेंच्या निवडणुकीत मोठं घडतंय! महायतीतून अर्ज भरणाऱ्या अंबादास दानवेंचा विजय की पराभव?
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदी
मोठा पूर! 33 हजार 408 क्युसेकने विसर्ग सुरू, महाराष्ट्रातील पवित्र नदीचा धडकी भरवणारा Video
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्या
मविआ'तील गळती काही थांबेना! पद, 20 कोटी अन्... बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये
अखेर शिंदेंनी दिलेला शब्द पाळला! प्रकृती ठिक नसतानाही थेट काश्मीरमध्ये पोहोचवली मदत
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरे
सचिन अहिर यांनी पक्ष प्रवेश करताच मुलीची प्रतिक्रिया, थेट आदित्य ठाकरेंवर... नेमकं काय म्हणाली?
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
राज्यात पावसाचा हाहाकार! विज पुरवठाही खंडीत, तब्बल 4 शहरांना...
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?